ETV Bharat / state

बैलगाडीशर्यत प्रकरणी गोपीचंद पडळकरांच्या विरोधात मनसेचे आंदोलन - सांगली आंदोलन बातमी

आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगलीच्या झरे येथील वाक्षेवाडी येथे बैलगाडी शर्यत भरवली होती. ही शर्यत म्हणजे न्यायालयाच्या बंदीचे अवमान असल्याचा आरोप करत मनसेचे शर्यतीचा निषेध नोंदवला.

आंदोलक
आंदोलक
author img

By

Published : Aug 21, 2021, 4:51 PM IST

Updated : Aug 21, 2021, 5:28 PM IST

सांगली - आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगलीच्या झरे येथील वाक्षेवाडीच्या पठारावर छकडा बैलगाडीची शर्यत भरवली होती. ही शर्यत म्हणजे न्यायालयाच्या बंदीचे अवमान असल्याचा आरोप करत शर्यत घेतल्याच्या महाराष्ट्र नव निर्माण सेनेकडून निषेध नोंदवण्यात आला आहे. सांगली मनसेकडून आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात आंदोलन करत पडळकरांचे प्रतिकात्मक प्रतिमेचे दहन करण्यात आले.

माहिती देताना मनसेचे जिल्हाध्यक्ष

पडळकरांच्या विरोधात मनसे रस्त्यावर

बैलगाडी शर्यतीला परवानगी मिळावी यासाठी 20 ऑगस्टला झरे याठिकाणी बैलगाडी शर्यतीचे आयोजन करत वाक्षेवाडी येथे बैलगाडी शर्यत घेतली. या प्रकरणी मनसेकडून निषेध नोंदवण्यात आला आहे. मनसेचे सांगली जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. न्यायालयाचा आदेश डावलून शर्यत घेतल्याच्या निषेधार्थ यावेळी जोरदार घोषणाबाजी करत आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेचे दहन करण्यात आले.

केंद्राला सोडून राज्याला कोंडीत पकडण्याचा उद्योग

यावेळी तानाजी सावंत म्हणाले, बैलगाडी शर्यत घेण्याच्या प्रकार म्हणजे केवळ स्टंटबाजी असून शेतकऱ्याला शर्यतीपासून लांब करायचे काम केंद्राकडून केले जात आहे. राज्य सरकारला कोंडीत पकडण्याचा काम पडळकर करत आहेत. हा विषय केंद्राकडे आहे. अनेक वर्षांपासून केंद्रात भाजपची सत्ता आहे. पण, गोपीचंद पडळकर राज्य सरकारच्या विरुद्ध आंदोलन करत आहेत. शेतकऱ्याची दिशाभूल पडळकर करत आहेत, असा आरोपही सावंत यांनी केला आहे.

राज्यात सत्ता असताना का शर्यत सूचली नाही

भाजपची केंद्रात सत्ता आहे. राज्यातही भाजपची सत्ता होती. त्यावेळी पडळकर यांना बैलगाडी शर्यत का सूचली नाही, असा सवाल उपस्थित करत ही केवळ स्टंटबाजी असल्याचा आरोपही सावंत यांनी केला आहे.

काय आहे प्रकरण...?

आमदार गोपीचंद पडळकर यांनी शुक्रवारी (दि. 20 ऑगस्ट) बैलगाडी शर्यतीचे आयोजन त्यांच्या मुळगावी म्हणजेच झरे (ता. आटपाडी) केले होते. मात्र, पोलिसांनी शर्यतीचे मैदान उखरुन काढले होते. तसे झरेसह आसपासच्या गावांमध्ये संचारबंदीचे आदेश जारी केले होते. तरीही शर्यतीवर पडळकर ठाम होते. अखेर 20 ऑगस्ट रोजी पहाटे आमदार पडळकर समर्थकांनी झरे गावानजीक असणाऱ्या वाक्षेवाडी याठिकाणी पोलिसांना चकवा देत गनिमीकाव्याने बैलगाडी शर्यती पार पाडल्या. यावेळी मैदानात 7 बैलगाडी जोडी पळवण्यात आल्या. तर यानिमित्ताने हजारो बैलगाडी प्रेमी व पडळकर समर्थक हजर होते. शर्यत झाल्यानंतर याठिकाणी पोलिसांनीही धाव घेतली होती. त्यामुळे पडळकर समर्थक व पोलीस प्रशासन आमने-सामने आल्याने काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

आमदार पडळकरांसह 41 जणांवर गुन्हे दाखल

बेकायदेशीर बैलगाडी शर्यत घेतल्याप्रकरणी जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी प्रशासनाला गुन्हे दाखल करण्याच्या सूचना केल्या होते. त्यानुसार आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह 41 कार्यकर्त्यांविरोधात आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. बेकायदा जमाव जमविणे, सर्वाेच्च न्यायलायाच्या आदेशाची पायमल्ली करणे, कोरोनाकाळात आपत्ती व्यवस्थापनाच्या नियमांचे भंग करणे तसेच प्राणीजीवन कायद्याअंतर्गत हे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचा - महाराष्ट्रातील स्थिती तालिबानपेक्षा वेगळी नाही - आमदार खोत

Last Updated : Aug 21, 2021, 5:28 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.