ETV Bharat / state

आ.गोपीचंद पडळकर समर्थकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचे समर्थक विट्याचे युवा नेते राजू जानकर, प्रा.नारायण खरजे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शनिवारी प्रवेश केला. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी पक्षात प्रवेश केला. यावेळी युवक राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, कार्याध्यक्ष रविकांत वरपे यांची देखील उपस्थिती होती.

MLA Gopichand Padalkar's supporters join NCP in sangli
आ.गोपीचंद पडळकर समर्थकांचा राष्ट्रवादीत प्रवेश
author img

By

Published : Jan 2, 2021, 6:39 PM IST

इस्लामपूर (सांगली) भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचे समर्थक विट्याचे युवा नेते राजू जानकर, प्रा.नारायण खरजे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शनिवारी प्रवेश केला. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी पक्षात प्रवेश केला. यावेळी युवक राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, कार्याध्यक्ष रविकांत वरपे यांची देखील उपस्थिती होती.

राजू जानकर यांची युवक राष्ट्रवादीच्या प्रदेश सरचिटणीसपदी तर नारायण खरजे यांची प्रदेश सचिवपदी निवड करण्यात आली आहे. यानंतर दोन्ही नव्या पदाधिकाऱ्यांनी लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. यावेळी बोलताना राजू जानकर म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून, आम्ही राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. त्यांनी देखील आमच्यावर विश्वास दाखवून आम्हाला राज्य पातळीवर काम करण्याची संधी दिली. आम्ही त्यांचा विश्वास सार्थ ठरवू, तर खरजे बोलताना म्हणाले की पूर्वीच्या पक्षात केवळ स्टंटबाजी सुरू होती. मात्र आता आम्ही राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. तरुणांच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही येत्या काळात काम करू.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.