ETV Bharat / state

लॉकडाऊनमध्ये 'जुगार'चा उद्योग; मुद्देमालासह १० जणांना अटक.

शहरातील गुरुवारी पेठ येथील घुडीमार वाडा याठिकाणी एका बंगल्यात हा जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती मिरज पोलिसांना मिळाली. यानंतर सहायक पोलीस निरीक्षक इंद्रजित वर्धन व त्यांच्या पथकाने जुगार अड्ड्यावर छापा मारला. यावेळी या ठिकाणी जुगार खेळत असलेले 10 जण सापडले

JUGAR
JUGAR
author img

By

Published : Apr 11, 2020, 7:59 AM IST

सांगली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असताना मिरजेत सुरू असलेल्या एका जुगार अड्ड्याचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. जुगार अड्ड्यावर छापा टाकत लाखोंच्या मुद्देमालासह १० जणांना अटक केली आहे.

इंद्रजित वर्धन - सहायक पोलीस निरीक्षक,मिरज पोलीस ठाणे
कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने संपूर्ण देशासह सांगली जिल्ह्यातही कडकडीत संचारबंदी आहे. मात्र, या संचारबंदीत मिरजेत चक्क एक जुगार अड्डा सुरू असल्याचा प्रकार समोर आला आहे. शहरातील गुरुवारी पेठ येथील घुडीमार वाडा याठिकाणी एका बंगल्यात हा जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती मिरज पोलिसांना मिळाली. यानंतर सहायक पोलीस निरीक्षक इंद्रजित वर्धन व त्यांच्या पथकाने जुगार अड्ड्यावर छापा मारला. यावेळी या ठिकाणी जुगार खेळत असलेले 10 जण सापडले. या सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेत ,या ठिकाणी जुगाराचे साहित्य ,रोख रक्कम ,दोन मोटारसायकल ,असा एक लाख चार हजार पाचशे नव्वद रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी १० जणांवर मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.