मिरज (सांगली) - येथील एका महाविद्यालयात शिकणाऱ्या ५६ विद्यार्थिनींना ओमायक्रॉनची ( miraj medical student omicron Positive ) लागण झाली असल्याचे रविवारी (ता. ९) स्पष्ट झाले. दिल्ली येथील इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च ( Delhi Indian Council Medical Research Student ) या संस्थेमध्ये तपासणीसाठी पाठवलेल्या या विद्यार्थिनींच्या नमुन्यांचा अहवाल रविवारी महाराष्ट्र सरकारच्या विशेष विभागास प्राप्त झाला. त्यामध्ये त्यांच्यात ओमायक्रॉनची लक्षणे असल्याचे स्पष्ट झाले आहे. सध्या या विद्यार्थिनींना क्वारंटाईन करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले आहे. हा संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे.
५६ विद्यार्थिनींना ओमायक्रॉनची लागण -
दिल्ली येथील इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च या संस्थेत झालेल्या नमुणे तपासणीत ५६ विद्यार्थिनींना ओमायक्रॉनची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर पुणे येथील प्रयोगशाळेत झालेल्या तपासणीत एकाही विद्यार्थिनीला ओमायक्रॉनची लागण झाले नसल्याचे स्पष्ट झाले.
प्रशासनाने तातडीने केले विलगीकरण -
याबाबतचा अधिकृत अहवाल इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च या संस्थेकडून राज्य शासनाच्या विशेष कक्षास पाठविण्यात आला आहे होते. याबाबतच्या अधिकृत सूचना रविवारी रात्री उशिरा मिरज वैद्यकीय महाविद्यालयास प्राप्त झाल्या होत्या. त्यानंतर महाविद्यालय प्रशासनाने तातडीने या ५६ विद्यार्थिनींना पुन्हा वेगळे करून त्यांच्यावरील उपचारांची स्वतंत्र व्यवस्था केली आहे. याशिवाय हा परिसर प्रतिबंधित केला आहे.
हेही वाचा - Omicron Symptoms : जाणून घ्या... AIIMS ने जाहीर केलेली ओमायक्रॉनची धोकादायक लक्षणे