सांगली - एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून खून करणाऱ्या अल्पवयीन आरोपीस सांगली न्यायालयाने 12 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. मिरज तालुक्यातील तुंग याठिकाणी हा धक्कादायक प्रकार घडला होता.
अल्पवयीन आरोपीस सक्त मजुरीची शिक्षा
20 मे, 2020 रोजी मिरज तालुक्यातील तुंग येथील एक अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची घटना घडली होती. शोध सुरू असताना दुसऱ्या दिवशी हाळ भाग याठिकाणी सदर मुलीचा मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलिसांमध्ये मुलीच्या वडीलांनी तक्रार दिलीली होती. ज्यामध्ये एक संशयित मुलासोबत खेळत असल्याचे समोर आले होते. त्यानुसार पोलिसांनी संशयित अल्पवयीन मुलास ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता त्याने मुलीला गावातील ऊसाच्या शेतात नेऊन मुलीचे अश्लील चित्रफीत काढून तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर मुलीचा गळा आवळून खून केल्याची कबुली दिली होती. या बलात्कार आणि खून प्रकरणी सांगली जिल्हा सत्र न्यायालयात खटला सुरू होता. यामध्ये 15 साक्षीदारांची साक्ष झाली, त्या आधारे जिल्हा सत्र न्यायालयाने संशयित आरोपीस दोषी ठरवत 12 वर्षे सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे. खटल्याचे सरकारी वकील म्हणून अरविंद देशमुख यांनी काम पाहिले.
देशातील पहिलीच घटना
बलात्कार व खून प्रकरणात अटक केले त्यावेळी संशयित आरोपीचे वय हे 16 वर्षे 8 महिने होते. तर आरोपी अज्ञान असल्यामूळे बाल न्याय अधिनियम 2015 चे कलम 75 अन्वये नवीन कायदा दुरुस्ती नुसार गुन्हा क्रूरतेचा असल्यामुळे भारतीय दंडविधानातील तरतुदीनुसार विशेष न्यायलयात चालला. नवीन कायदा दुरुस्तीनुसार हा गुन्हा महाराष्ट्र राज्यात पहिलाच चालला असून त्यामध्ये आरोपीस शिक्षा झालेली भारतातील पहिलीच घटना आहे.
हेही वाचा - सांगलीत कैद्याची गळफास घेऊन आत्महत्या