सांगली - राष्ट्रवादीच्या खंजीरमुळे जर खरच काँग्रेस रक्तबंबाळ झाली असेल,तर काँग्रेसने सत्ते मधून बाहेर पडावे,असा सल्ला केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी नाना पटोले यांना दिला आहे. तसेच राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांची माफी मागायला हवी,अशी मागणी देखील मंत्री आठवले यांनी केली.
राष्ट्रवादीच्या खंजीरमुळे रक्तबंबाळ झालाय तर सत्तेतुन बाहेर पडा - मंत्री रामदास आठवलेंचा काँग्रेसला सल्ला - सांगली मंत्री रामदास आठवले बातमी
राष्ट्रवादी काँग्रेसकडून तुमच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. त्यामुळे तुम्ही जर एवढे रक्तबंबाळ झाला असाल,तर राष्ट्रवादी सोबत राहणं योग्य होणार नाही.काँग्रेसने सरकारमधून बाहेर पडावे,अशी नाना पटोले यांना माझा सल्ला आहे. एवढा अपमान होत असेल,तर काँग्रेसने आपला स्वाभिमान जिवंत ठेवावा. तसंच शिवसेना आणि राष्ट्रवादी सरकार चालवत आहे,त्यामुळे काँग्रेसला सरकारमध्ये काही महत्व नाही,असा टोलाही मंत्री आठवले यांनी लगावला आहे.
मंत्री रामदास आठवलेंचा काँग्रेसला सल्ला
सांगली - राष्ट्रवादीच्या खंजीरमुळे जर खरच काँग्रेस रक्तबंबाळ झाली असेल,तर काँग्रेसने सत्ते मधून बाहेर पडावे,असा सल्ला केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी नाना पटोले यांना दिला आहे. तसेच राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांची माफी मागायला हवी,अशी मागणी देखील मंत्री आठवले यांनी केली.
Last Updated : Jun 1, 2022, 8:46 PM IST