ETV Bharat / state

राज ठाकरे म्हणजे भाजपाचे बुजगावणे - जयंत पाटील - राज ठाकरे म्हणजे भाजपाचे बुजगावणे बातमी

कार्ल मार्क्सने म्हटले आहे,धर्म ही अफूची गोळी आहे,आणि ही अफूची गोळी देण्याचे काम सध्या भारतीय जनता पार्टीकडून महागाईच्या मुद्द्यावरून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी सुरू आहे. त्यासाठी काही लोकांचं बुजगावण्याचा वापर चालू झाला आहे.जे स्वतः करता येत नाही,ते बुजगावण्याचा मार्फत चालू झाला आहे,अश्या शब्दात मंत्री जयंत पाटील यांनी राज ठाकरे यांचा उल्लेख बुजगवणा म्हणून करत भाजपावर टीका केली.

minister jayant patil on raj thackeray role of loud speaker in sangli
राज ठाकरे म्हणजे भाजपाचे बुजगावणे
author img

By

Published : May 4, 2022, 10:53 PM IST

सांगली - भाजपाकडून देशातल्या महागाईवरून लक्ष विचलीत करण्यासाठी धर्माच्या अफूचा गोळीचा वापर सुरू असून त्यासाठी काही लोकांचा बुजगावणे म्हणून वापर करण्यात येत असल्याची टीका जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. तसेच फडणवीस माझे चांगले मित्र आहेत. पण त्यांनी मला कधी बाबरी पतनचा प्रसंग सांगितला नाही. मात्र, त्यांना आता खासगीमध्ये नक्की विचारणार,असा खोचक टोला जयंत पाटलांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला.

राज ठाकरे आणि फडणवीसांवर निशाणा - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगलीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमधून भाजप,राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. भोंगे व अजान भूमिकेवरून मनसे नेते राज ठाकरे यांच्यावर टीका करताना जयंत पाटील म्हणाले, मनसेकडून अशा पद्धतीने काही होईल,असे आपल्याला वाटत नाही. जर तसं काही झाल्यास महाराष्ट्र पोलीस दल योग्य ती कारवाई करेल. पण अशा पद्धतीने ज्या वेळी काही आंदोलन होतात,त्यावेळी रस्त्यावर उतरणाऱ्या तरुण मुलांचा करिअर खराब होतं. अशा आंदोलनात तरुण रस्त्यावर उतरतात, पोलीस त्यांना पकडतात, ते तुरुंगात जातात, मग त्यांचे करियर खराब होते, अनेक अडचणी येतात. त्यामुळे घोषणा करणारे घोषणा करतात, चिथावणी देणारे चिथावणी देत असतात, प्रसंग आणि त्याला शेवटी तोंड देण्याचे काम रस्त्यावर उतरलेले तरुण करत असतात. त्यांच्या आयुष्याची बरबादी करण्याचा हा प्रकार आहे. मग तरुण लढत बसतात आणि त्यांचे पालक रडत बसतात,अशी परिस्थिती आहे. त्यामुळे माझे सर्वांना आवाहन आहे,पुढे कितीही चिथावणी दिली तरी त्याला बळी पडायचं नाही.आवाज मर्यादेचा प्रश्न आहे,त्याबाबत पोलीस प्रशासन नक्कीच कारवाई करतील,कोणता धर्म आहे,हे महत्त्वाचे नाही,न्यायालयाच्या नियमानुसार जे आवाज मर्यादा आहे, त्यानुसार पोलीस प्रशासन त्या गोष्टी करतील ,असा विश्वास देखील मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे.

भाजपाकडून धर्मच्या अफूची गोळी - त्याच बरोबर आज देशात महागाई प्रचंड वाढली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना संसार करणे अवघड झाले आहे.
महागाईचा सामना कसा करायचा हा कोट्यवधी जनतेच्या समोर प्रश्न आहे. कार्ल मार्क्सने म्हंटले आहे,धर्म ही अफूची गोळी आहे,आणि ही अफूची गोळी देण्याचे काम सध्या भारतीय जनता पार्टीकडून महागाईच्या मुद्द्यावरून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी सुरू आहे. त्यासाठी काही लोकांचं बुजगावण्याचा वापर चालू झाला आहे.जे स्वतः करता येत नाही,ते बुजगावण्याचा मार्फत चालू झाला आहे,अश्या शब्दात मंत्री जयंत पाटील यांनी राज ठाकरे यांचा उल्लेख बुजगवणा म्हणून करत भाजपावर टीका केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.