ETV Bharat / state

जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती नियंत्रणात, संख्या वाढणार नाही - पालकमंत्री जयंत पाटील - जलसंपदा मंत्री जयंत पाटील

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सज्ज असून प्रशासनाचे परिस्थितीवर पूर्ण नियंत्रण आहे. या संकटाचा मुकाबला करत असताना आवश्यक तो सर्व निधी उपलब्ध करून देण्यात येईल. त्यामुळे औषधे, वैद्यकीय उपकरणे, यांची तात्काळ खरेदी करा. त्यामध्ये कोणतीही तडजोड करू नका, अशा सूचनाही अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी सांगितले आहे.

Jayant Patil
पालकमंत्री जयंत पाटील
author img

By

Published : Mar 30, 2020, 7:30 AM IST

Updated : Mar 30, 2020, 8:43 AM IST

सांगली - जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीवर प्रशासनाचे पूर्ण नियंत्रण आहे. सध्याची स्थिती पाहता जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढणार नसल्याचा विश्वास पालकमंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला. तरीही प्रशासन सज्ज असून मिरजेच्या रुग्णालयात 315 बेड तयार करण्यात आल्याची माहितीही पाटील यांनी सांगलीमध्ये बोलताना दिली.

आढावा घेताना पालकमंत्री पाटील

सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मिरजेच्या कोरोना रुग्णालयाला भेट दिली आहे. यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करत जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. कोरोना रुग्णांच्या प्रकृतीचीही मंत्री पाटील यांनी चौकशी केली. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथील एकाच कुटुंबातील 25 जणांना कोरोनाची लागण झाल्याने संपूर्ण देशासह राज्यात खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासन हायअलर्टवर आहे. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचा हा इस्लामपूर मतदार संघ आहे. तर कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर व संचारबंदी यामुळे जयंत पाटील मुंबईमध्ये होते. जिल्ह्यातील सर्व परिस्थितीवर तेथून लक्ष ठेवून प्रशासनाला सूचना देत होते. मात्र रुग्णांची संख्या वाढू लागल्याने जयंत पाटलांनी मुंबई सोडत थेट सांगली गाठली. तसेच कोरोना रुग्ण उपचार घेत असलेल्या मिरज येथील शासकीय रुग्णालयात भेट दिली.

मुंबई येथून आलेल्या उच्च वैद्यकीय अधिकारी व कोरोना नोडल अधिकारी यांच्याकडून जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा त्यांनी घेतला व कोरोना रुग्णांच्या प्रकृतीचीही चौकशी करत सर्व पातळ्यांवर खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या. यानंतर प्रशासनाकडून जिल्ह्यातील स्थितीचा आढवा घेतला. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आहे. सुरुवातीला ज्या चार व्यक्तींना कोरोनाची लागण झाली. त्यांच्याच कुटुंबातील आतापर्यंत 25 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या व जवळच्या नातेवाईकांना होम क्वारंटाईन, इन्स्टिट्यूट क्वारंटाईन आणि आयसोलेशन कक्षात ठेवण्यात आले असून त्यांच्यावर 24 तास कडक निगराणी ठेवण्यात येत आहे. त्या सर्वांची प्रकृती सध्या स्थिर आहे. तसेच प्रशासनाकडून इस्लामपूर शहर ज्या पद्धतीने लॉकडाऊन करण्यात आलेले आहे, ती परिस्थितीत पाहता सांगली जिल्ह्यातील कोरोना रुग्ण वाढणार नाहीत, असा विश्‍वास जयंत पाटील यांनी यावेळी व्यक्त केला आहे. कार्यरत असणाऱ्या वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी लागणारे विशेष गणवेश मागवण्यात आले आहेत. मात्र याठिकाणी व्हेंटिलेटरची कमतरता निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यासाठी सामजिक संस्था, उद्योजक यांनी पुढे यावे, असे आवाहन पाटील यांनी केले आहे.

Last Updated : Mar 30, 2020, 8:43 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.