ETV Bharat / state

मंत्री बच्चू कडू यांचा सरकारला घरचा आहेर.. वीज बिल, एसटी आंदोलनावरून ठाकरे सरकार इशारा - एसटी कर्मचारी संप

वीज बिल माफ केल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही. तसेच एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात प्रसंगी प्रहार संघटनाही उतरेल, असा इशारा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आघाडी सरकारला दिला आहे.

Bachchu Kadu
Bachchu Kadu
author img

By

Published : Nov 29, 2021, 7:31 PM IST

Updated : Nov 29, 2021, 7:45 PM IST

सांगली - राज्यातील शेतकऱ्यांच्या मानगुटीवर विद्युत विभाग बसलयं, मात्र वीज बिल माफ केल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही. तसेच एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात प्रसंगी प्रहार संघटनाही उतरेल, असा इशारा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आघाडी सरकारला दिला आहे. तसेच एक डिसेंबरपासून महाराष्ट्रात पहिली ते चौथी वर्गाच्या शाळा सुरू होतील, असा विश्वासही मंत्री बच्चू कडू यांनी व्यक्त केला आहे.

बच्चू कडू यांचा सरकारला घरचा आहेर..

सांगलीच्या इस्लामपूर या ठिकाणी प्रहार संघटनेच्या वतीने कृषी क्रांती प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. याचे उद्घाटन कामगार व महिला बालकल्याण राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते झाले. शेतकऱ्यांच्या उन्नतीच्या दृष्टीने आयोजित या प्रदर्शनामध्ये 100 हून अधिक स्टॉल सहभागी आहेत. या उद्घाटन समारंभ प्रसंगी बोलताना राज्यमंत्री बच्चू कडू यांनी महाविकास आघाडी सरकारला घरचा आहेर दिला आहे. राज्यातील शिक्षण धोरणावरून बोलताना शिक्षणाविषयी कायद्यात बदल करणे गरजेचे आहे. कायदा कुचकामी स्वरूपाचा आहे. कायदा पालकांच्या बाजूचा नसून, तो संस्था चालकांच्या बाजूचा आहे. शिक्षण कायद्यात बदल करण्याबाबत आम्ही पाठपुरावा करत आहोत, असे स्पष्ट केले आहे.

कार्यक्रमात बोलताना बच्चू कडू
वीज बिल माफ झालंच पाहिजे..
तर सध्या राज्यात थकीत वीज बिलाच्या बाबतीत शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मानगुटीवर विद्युत विभाग बसले आहे. मुख्यमंत्री यांच्याकडे 50 टक्के वीज बिल माफ करून विद्युत कनेक्शन चालू ठेवा, अशी मागणी केली आहे. तर येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत वीज माफी मुद्दयावर चर्चा होणार आहे. वीज माफी केल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही, असा इशारा मंत्री यांनी स्वतःच्या सरकारला दिला आहे.
अन्यथा प्रहार संघटना आंदोलनात -
राज्यमंत्री बच्चू कडू यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला समर्थन केले आहे. कलेक्टरच्या, मंत्री यांच्या गाडीवरील चालकाला 40 हजार पगार आहे, मात्र 100 लोकांना घेऊन जाणाऱ्या एसटी चालकाला 12 हजार पगार हे चुकीचे आहे. त्यामुळे एसटी कर्मचारी यांच्या मागण्यांबाबत सरकारने विचार केला पाहिजे. अन्यथा प्रसंगी प्रहार संघटना आंदोलनात उतरेल, असा ही इशारा मंत्री बच्चू कडू यांनी दिला आहे.
1 डिसेंबर पासून शाळा सुरू होणार -
राज्य सरकार या कर्मचारयांच्या पाठिशी राहील. प्रसंगी प्रहार संघटनाही एसटी कर्मचारयांच्या बाजूने आंदोलनात उतरेल. त्याच बरोबर राज्यात 1 डिसेंबर पासून शाळा या सुरू होणार आहेत. शाळा सुरू करण्याचे सर्व नियोजन केले आहे. तसेच राज्यात कोरोना व्हेरियंट ओमिक्रॉन येणार नाही, याची काळजी सरकार घेत आहे,असेगी कडू यांनी स्पष्ट केले आहे.

Last Updated : Nov 29, 2021, 7:45 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.