सांगली - जिल्ह्यात पावसाचा कहर कायम आहे. मागील पाच दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील नदी, नाले, ओढ्यांना पूर आला आहे. त्यामुळे जवळपास 71 मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. तर या अतिवृष्टीचा सर्वात मोठा फटका शेतीला बसला असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.
मागील पाच दिवसांपासून सांगली जिल्ह्यात पावसाचा थैमान सुरू आहे. दुष्काळी जत कवठेमहांकाळ, खानापूर, आटपाडी, तासगाव या तालुक्यांसह जिल्ह्यात जवळपास सर्वत्र अतिवृष्टी सुरू आहे. पडणाऱ्या संततधार पावसामुळे नदी, नाले, ओढ्यांना पूर आला आहे. तर तलाव भरून ओसंडून वाहत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील सुमारे 50 हुन अधिक छोटे-मोठे पूल पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. काही ठिकाणची वाहतूक ठप्प झाली आहे. काही ठिकाणी छोटे बंधारे आहेत ते वाहून गेलेले आहेत. दुष्काळी जत, कवठेमंकाळ, तासगाव, खानापूर, आटपाडी यासह कडेगाव, वाळवा, शिराळा, पलूस तालुक्यातील अतिवृष्टी झालेली आहे. त्यामुळे ओढे-नाल्यांना पूर आला आहे. अनेक छोटे-मोठे बंधारे त्यामुळे पाण्याखाली गेले आहे. त्यामुळे अनेक गावांचा जवळचा संपर्क एकमेकांशी तुटला आहे तर अनेक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात ते पावसाचे पाणी आल्याने जिल्ह्यातील 71 मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे.
हेही वाचा - पुराच्या पाण्यात अडकलेल्या 22 जणांना सुरक्षित स्थळी हलविण्यात यश