ETV Bharat / state

विविध मागण्यांसाठी सांगलीतील मंडप डेकोरेटर्स व्यावसायिकांचे धरणे आंदोलन - सांगली मंडप व्यावसायिक आंदोलन

कोरोनाच्या लॉकडाऊन काळात सांगली जिल्ह्यात मंडप, लाईट आणि डेकोर्टर व्यावसायिकांचे 100 कोटींहुनचे अधिक नुकसान झाले आहे. त्यामुळे मंडप,लाईट आणि व्यवसायिकांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. त्यामुळे विविध मागण्या करत आज मंडप व्यावसायिकांनी राज्यव्यापी आंदोलन केले आहे.

Mandap Decorators in Sangli
सांगलीतील मंडप डेकोरेटर्स व्यावसायिकांचे धरणे आंदोलन
author img

By

Published : Nov 2, 2020, 4:57 PM IST

Updated : Nov 2, 2020, 5:04 PM IST

सांगली - लॉकडॉऊनचा फटका बसलेल्या मंडप, लाईट आणि डेकोरेटर्स व्यावसायिकांनी आज विविध मागण्यांसाठी राज्यव्यापी आंदोलन सुरु केले आहे. त्याप्रमाणे सांगलीमध्ये देखील जिल्ह्यातील मंडप व्यावसायिकांनी धरणे आंदोलन केले. कोरोना काळात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये मंडप व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सध्या देश हळूहळू अनलॉक होत आहे. मात्र, मंडप व्यावसायिकांना अद्याप व्यवसाय सुरू करण्याची परवानगी देण्यात आली नाही. त्यामुळे धरणे आंदोलन करत व्यावसायिकांना नुकसान भरपाई देण्यात, यावी यासह लग्नसमारंभासाठी माणसांची उपस्थिती मर्यादा वाढवण्यात यावी, अशा मागण्या आंदोलकांनी केल्या आहेत.

सांगलीतील मंडप डेकोरेटर्स व्यावसायिकांचे धरणे आंदोलन

रोहित आर आर पाटलांचा पाठिंबा-

शहरातल्या स्टेशन चौक या ठिकाणी जिल्ह्यातील मंडप, लाईट आणि डेकोरेशन व्यावसायिकांनी धरणे आंदोलन केले. या आंदोलनाला सर्व राजकीय पक्षांनी सुद्धा पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादीचे युवक नेते रोहित आरआर पाटील यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन व्यवसायिकांच्या आंदोलनाला पाठिंबा देत राज्य शासन त्यांच्या पाठीशी असून संकटात सापडलेल्या या व्यवसायिकांना शासना नक्कीच मदत करण्याचा प्रयत्न करेल, असे आश्वासन रोहित पाटील यांनी यावेळी दिले आहे.

१०० कोटीहून अधिक नुकसान-

कोरोनाच्या लॉकडाऊन काळात सांगली जिल्ह्यात मंडप, लाईट आणि डेकोर्टर व्यावसायिकांचे 100 कोटींहुनचे अधिक नुकसान झाले आहे. त्यामुळे मंडप,लाईट आणि व्यवसायिकांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. जिल्ह्यातील सुमारे 1200 मंडप, डेकोरेटर्सचा व्यवसाय ठप्प झाला. यामुळे मंडप व्यावसायिकांचे साहित्य हे अक्षरशः धूळ खात पडले आहे. यातच सरकारने लग्न कार्यासाठी 50 लोकांनाच परवानगी दिली असल्याने मंडप व्यावसायिकांच्या अडचणी वाढल्या आहेत.

राज्यात आता अनलॉक सुरू होत असताना इतर व्यावसायांना परवानगी दिली जात आहे. त्याप्रमाणे लग्नसमारंभासाठी आता 50 लोकांची मर्यादा उठवून 500 करावी, मंडप व्यावसायिकांच्या झालेल्या नुकसानाची दखल घेऊन शासनाने मंडप, लाईट आणि डेकोरेटर्स व्यवसायिकांना आर्थिक मदत करावी अशा मागण्या या व्यावसायिक आंदोलकांनी सरकारकडे केल्या आहेत.

Last Updated : Nov 2, 2020, 5:04 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.