सांगली - दारू पिण्यासाठी आईने पैसे न दिल्याच्या रागातून वडीलांना काठीने मारहाण केल्याची घटना एक वर्ष आधी वाळवा तालुक्यातील चिकुर्डे टाकळी वसाहतीत घडली होती. या घटनेतील आरोपी लक्ष्मण हरी पाटील (वाघमारे) याला न्यायालयाने जन्मठेप तसेच 500रुपये दंड आणि दंड न भरल्यास 6 महिने कारावसाची शिक्षा सुनावली.
काय होते प्रकरण -
लक्ष्मण हा घरातील लोकांकडे वारंवार दारु पिण्यासाठी पैशाची मागणी करत होता. तसेच पैशांसाठी अनेकदा स्वत:च्या आई-वडीलांनादेखील त्याने मारहाण केली होती. त्याच्या या सततच्या त्रासाला कंटाळून पत्नीही माहेरी गेली होती. 19 जुलै 2019 रोजी सकाळी लक्ष्मणने त्याच्या आईकडे पैशाची मागणी केली होती. तेव्हा आईने त्याला पैसे देण्यास नकार दिला. या रागातून लक्ष्मणने वडील हरी कोंडीबा पाटील (वाघमारे) झोपले असताना लाकडी दांडके व छत्रीने मारहाण केली. त्यानंतर जखमी झालेल्या वडीलांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांंचा मृत्यू झाला होता.
हेही वाचा - मध्य प्रदेश : धर्मांतरणविरोधी अध्यादेशाला मंत्रीमंडळाची मंजुरी