ETV Bharat / state

किडनी प्रत्यारोपणाच्या नावाखाली दहा लाखांचा गंडा

किडनी प्रत्यारोपणाच्या नावाखाली एका व्यक्तीची तब्बल दहा लाखांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना मिरजेत उघडकीस आली आहे. या प्रकरणी तामिळनाडू आणि हैदराबादमधील दोघांवर मिरज शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

Miraj City Police Thane
मिरज शहर पोलीस ठाणे
author img

By

Published : Dec 8, 2021, 10:32 PM IST

सांगली - किडनी प्रत्यारोपणाच्या नावाखाली एका व्यक्तीची तब्बल दहा लाखांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना मिरजेत उघडकीस आली आहे. या प्रकरणी तामिळनाडू आणि हैदराबादमधील दोघांवर मिरज शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. वैद्यकीय नगरीत या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे.

हेही वाचा - अवकाळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेणार - मंत्री जयंत पाटील

किडणी देण्याच्या बहाण्याने फसवणूक

सध्या मिरज या ठिकाणी राहणारे मूळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कणकवली येथील परशुराम प्रभाकर उपरकर ( वय 59 ) यांची तब्बल दहा लाखांची फसवणूक झाली आहे. किडनी प्रत्यारोपण करण्यासाठी त्यांच्याकडून दहा लाख रुपये घेण्यात आले होते. याबाबत उपरकर यांनी मिरज शहर पोलीस ठाण्यामध्ये
नंदगोपाल ( वय ४३ मघावरनगर, चेन्नई, तमिळनाडू) आणि व्यंकटेश राव उर्फ वेंकी (अपोलो मेडिकल ऑफीस, हैद्राबाद) या दोघांविरोधात फसवणुकीची तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

प्रत्यारोपणासाठी दहा लाख उकळले

परशुराम उपरकर यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या आहेत. उपचारासाठी ते काही महिन्यांपूर्वी मिरज शहरातल्या महात्मा गांधी चौक येथील एका रुग्णालयात गेले होते. त्यानंतर घरी परतत असताना त्यांना नंदगोपाल याने गाठून आपण वैद्यकीय व्यवसायिक असल्याचे सांगत त्यांच्या किडनी प्रत्यारोपणाबाबत आपण त्यांना मदत करू शकतो, असा विश्वास दिला. नंदगोपल यांने अनेक मोठ्या डॉक्टरांसोबत आपली ओळखी असल्याचे सांगितले, फोटोही दाखवले. त्यानंतर किडनी प्रत्यारोपणाच्या प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती देत प्रत्यारोपणाच्या आधी पाच लाख रुपये द्यावे लागतात, असे सांगितले.

पैसे घेतले, पण किडनी नाही

त्यानंतर नंदगोपाल यांने परशुराम यांचा विश्वास संपादन केला आणि उपरकर यांनी नंद गोपाल याला पाच लाख रुपये दिले. त्यानंतर नंदगोपाल यांने त्याचा साथिदार व्यंकटेश राव याच्या मदतीने परशुराम उपरकर यांची मिरज आणि तामिळनाडू, विशाखापट्टनम या ठिकाणी विविध तपासण्या केल्या. या दरम्यान तपासणीसाठी आणखी पाच लाख रुपये उकळले. पण सर्व तपासण्या पूर्ण होऊन देखील किडनी प्रत्यारोपण प्रक्रिया झाली नाही. त्यामुळे, उपरकर यांनी प्रत्यारोपण कधी होणार? याबाबत वारंवार विचारणा केली. मात्र. त्यांना कोणत्याही प्रकारचे उत्तर या दोघांनी दिले नाही. किडनी प्रत्यारोपण न झाल्याने उपरकर यांनी दोघांकडे पैसे परत देण्याची मागणी लावून धरली. दोघांनीही पैसे देण्यास टाळाटाळ सुरू केली.

फसवणुकीविरोधात दोघांवर गुन्हे दाखल

त्यानंतर आपली फसवणूक झाल्याची बाब परशुराम उपरकर यांच्या लक्षात आली. त्यांनी मिरज शहर पोलीस ठाण्यामध्ये धाव घेत नंदगोपाल आणि व्यंकटेश राव उर्फ वेंकी या दोघांविरुद्ध फिर्याद दिली. या प्रकरणी मिरज शहर पोलीस तपास करत आहेत. मात्र, वैद्यकीय नगरी मिरज शहरात किडनी प्रत्यारोपणाच्या नावाखाली हा प्रकार उघडकीस आल्याने मिरज शहरात किडनी तस्करीचा प्रकार तर चालत नसले ना ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

हेही वाचा - सांगलीचा पूर लागला ओसरू.. आता 'मिशन शहर स्वच्छ', सांगलीसह 5 पालिकांची स्वछता पथके ऑन फिल्ड

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.