सांगली - प्रेयसीची हौस आणि तिच्यावर प्रभाव टाकण्यासाठी घरफोडी करणाऱ्या एका प्रेमवीराला पुन्हा सांगली पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत."व्हॅलेंटाईन डे"च्या तोंडावर मजूनला दुसऱ्यांदा इस्लामपूरमध्ये तुरुंगाची हवा खावी लागली आहे. कुणाला शिर्के असे या प्रेमवेड्या चोरट्याचे नाव आहे. त्याच्याकडून सात घरफोड्या उघडकीस आल्या आहेत.
प्रेयसीची हौस पुरवणे आणि तिच्यावर प्रभाव टाकणे सांगलीच्या इस्लामपूर येथील एका मजनूला चांगलंच भारी पडले आहे."व्हॅलेंटाईन डे"च्या तोंडावर दुसऱ्यांदा तुरुंगाची हवा खावी लागली आहे. कुणाल संजय शिर्के (वय वर्ष 26),असे या प्रेमवेड्या तरुणाचं नाव आहे. एक वर्षांपूर्वी कुणाल याने प्रेयसीची हौस पुरवण्यासाठी चोरी केल्याचा प्रकार घडला होता. त्यावेळी इस्लामपूर पोलिसांनी कुणालला फेब्रुवारी महिन्यातच बेड्या ठोकल्या होत्या. त्यानंतर पुन्हा जामिनावर कुणाल बाहेर होता आणि प्रेयसीवर असणाऱ्या प्रेमापोटी व आपल्या प्रेयसीला खुश करून तिच्यावर प्रभाव टाकण्यासाठी त्याने घरफोडी केल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी त्याच्याकडून इस्लामपूर शहरातील 5 व कोल्हापूर जिल्ह्यातील 2 अशा 7 घरफोड्या उघडकीस आणत सहा लाखांचे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत. विशेष म्हणजे हे सोन्याचे दागिने तो आपल्या प्रेयसीजवळ ठेवत असल्याचे समोर आले आहे.
प्रियकराचा व्हॅलेंटाईन डे तुरुंगात -
प्रेयसीवर असणाऱ्या प्रेमापोटी कुणाल हा चोऱ्या घरफोड्या करत असल्याचं उघड झाले आहे. गेल्या वर्षी कुणालला 11 चोऱ्या प्रकरणी अटक केली होती. आता त्याला व्हॅलेंटाईन डे च्या तोंडावर प्रेयसीबरोबर व्हॅलेंटाईन डे साजरा करण्याऐवजी कुणालला आता तुरंगात प्रेयसीच्या विरहात व्हॅलेंटाईन डे साजरा करावा लागणार आहे.