सांगली - शहराला गणेश नगरी म्हटले जाते. या गणेशनगरीत नुकत्याच आलेल्या महापुराच्या सावटाखाली गणरायाचे आगमन झाले. भक्तीभावाने गणेश भक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पांना घरोघरी विराजमान केले आहे.
भक्तीमय वातावरणात घरोघरी गणपतीची प्राणप्रतिष्ठा झाली करण्यात येत आहे. सकाळपासून शहरातल्या बाजारपेठ मध्ये आपल्या लाडक्या बाप्पांना घरी घेऊन जाण्यासाठी गणेश भक्तांनी मोठी गर्दी केली होती. काही ठिकाणी मिरवणुकांनी तर काही ठिकाणी साध्या पद्धतीने आपल्या लाडक्या गणरायाला घेऊन जाण्यासाठी गणेशभक्तांची धांदल पाहायला मिळाली. मात्र, या गणेशोत्सवावर यंदा महापुराची मोठी सावट असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
दरवर्षी गणेशभक्तांमध्ये जो उत्साह असतो तो कुठेतरी यंदा कमी असल्याचे दिसून आले आहे. अजूनही कृष्णाकाठ, वारणाकाठ महापुराच्या छायेखाली आहे. त्यामुळे गणेशोत्सवावर महापुराचे सावट पाहायला मिळत आहे.