सांगली - रस्त्याच्या मागणीसाठी खानापूर तालुक्यातल्या करंजे येथील ग्रामस्थांनी हातात टाळ घेऊन लॉंग मार्च सुरू केला आहे. गावकऱ्यांना हक्काचा रस्ता मिळावा या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी करंजे येथील ग्रामस्थांनी हे अनोखे आंदोलन सुरू केले आहे. बुधवारी विटा तहसील कार्यालयावर हा लाँगमार्च धडकणार आहे.
ग्रामस्थांचा टाळ वाजवत लाँगमार्च खानापूर तालुक्यातील करंजेमधील ग्रामस्थांनी हक्काचा रस्ता मिळत नसल्याने करंजे ते विटा असा टाळकरी लॉंगमार्च काढण्यात आला. सत्तर वर्षांपासून या गावातील नागरिक रस्त्यासाठी झगडत आहेत. मात्र, शासदरबारी याची दखल घेतली जात नसल्याने प्रहार जनशक्ती पक्ष, अखिल भारतीय किसान सभा आणि शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने आज शासनाच्या विरोधात आंदोलन सुरू करण्यात आहे. सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ग्रामस्थांनी करंजे ते विटा टाळकरी लॉंगमार्च काढला. 25 किलोमीटर पायी प्रवास करत 'हा' लाँगमार्च बुधवारी विटा तहसील कार्यालयावर धडकणार आहे. त्यानंतर त्याच ठिकाणी बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. दरम्यान, रस्ता मिळाल्याशिवाय मागे हटणार नसल्याचा ग्रामस्थांनी केला आहे.
हेही वाचा - मुलीने प्रेमविवाह केल्याने मुलाच्या वडिलांना झाडाला बांधून मारहाण, मंगळवेढ्यातील घटना