सांगली - जिल्ह्यातील १४ जणांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली असून १० जणांचे नमुने अद्याप प्रलंबित आहेत. तर जे २५ जण कोरोनाग्रस्त आहेत, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक संजय साळुंखे यांनी दिली. त्यामुळे सांगलीकरांना एक मोठा दिलासा मिळाला आहे.
सांगली जिल्ह्यातील सुमारे 24 जणांचे नमुने गेल्या दोन दिवसात 'स्वॅब' चाचणीसाठी पाठवण्यात आले होते. यामधील १४ जणांचे अहवाल आरोग्य विभागाला प्राप्त झाले आहेत. या १४ जणांचे अहवाल 'निगेटिव्ह' आले आहेत. यामुळे प्रशासन आणि सांगलीकरांना मोठा दिलासा मिळाला. या १४ जणांमध्ये दिल्लीच्या मरकझशी संबंधित ३ जणांचा समावेश आहे. तर उर्वरित १० जणांचे अहवाल प्रलंबित असून लवकरच ते प्राप्त होतील, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी दिली.
एक नजर जिल्ह्यातील कोरोना परस्थितीवर
परदेशवारी करणाऱ्यांची संख्या - १४८०.
होम क्वारंटाईन व्यक्ती - १००६ .
इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन व्यक्ती - ५६
आयसोलेशन व्यक्ती - २५
कोरोनाबाधित रुग्ण - २५
तर आतापर्यंत ३०५ लोकांचे १४ दिवसांचे होम-क्वारंटाईन पूर्ण झाले आहे.