ETV Bharat / state

कुरळप गावात ग्रामपंचायतीच्यावतीने गावातून जंतू नाशकाची फवारणी - कुरळप ग्रामपंचायत

कुरळप येथील ग्रामपंचायतीच्यावतीने कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून औषध फवारणी करण्यात आली. तसेच परिसर निर्जंतुक करण्यात आला.

कुरळप गावात ग्रामपंचायतीच्यावतीने गावातून जंतू नाशकाची फवारणी

author img

By

Published : Apr 7, 2020, 11:18 AM IST

सांगली - कुरळप येथील ग्रामपंचायतीच्यावतीने कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून औषध फवारणी करण्यात आली. तसेच परिसर निर्जंतुक करण्यात आला. मुख्य रस्ते, गावांतर्गतचे रस्ते, अडगळीचा परिसर व लोकवस्तीच्या ठिकाणी फवारणी करण्यात आली. ग्रामपंचायतीच्यावतीने दोनदा फवारणी करण्यात आली.

फवारणीसाठी सरपंच शोभाताई पंडित पाटील उपसरपंच संजय गायकवाड, माजी उपसरपंच गणेश सूर्यवंशी ग्रा. पं. सदस्य वसंतराव पवार सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ सहकार्य करीत आहेत. दरम्यान गावात लॉकडाऊनचे पालन काटेकोरपणे करण्यात येत आहे. नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी ग्रामपंचायतीनेही उपाययोजना सुरू केल्या आहेत. नागरिकांनी घरातच थांबावे. विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन करत कुरळप पोलीस आपली जबाबदारी पार पाडत आहेत. तर, सहायक पोलीस निरीक्षक अरविंद काटे स्वतः रस्त्यावर उतरले आहेत. गेल्या अकरा दिवसांपासून चौदा गावातील नागरिकांना उपदेश करत असल्याने काटे यांचे सर्व स्तरातून कौतूक होत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.