सांगली - जिल्ह्यात कृष्णा आणि वारणा नद्यांना महापूर आला असून सांगली मध्ये कृष्णा नदीची पाण्याची पातळी 54 फुटांवर पोहोचली आहे. सांगली शहरातल्या बाजारपेठ आणि पूर पट्ट्यासह शहरातील नागरी वस्तीसह अर्धा शहरात पाणी शिरले आहे. यामुळे सांगलीकरांची धडधड वाढली असली तरी ताकारी येथे कृष्णा नदीची पाण्याची पातळी 4 इंचाने घटली आहे. पावसाचा जोर ओसरल्याने पाणी पातळी सायंकाळनंतर स्थिर होऊन पाणी ओसरण्यास सुरुवात होईल, अशी माहिती पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली आहेत.
शहराच्या अनेक भागात शिरले पुराचे पाणी -
महापुराचे पाणी सांगली शहरातील दत्तनगर, काका नगर, सूर्यवंशी प्लॉट कॉलनी तसेच शहरातली बाजारपेठ, मारुती चौक, टिळक चौक, हरभट रोड याठिकाणी शनिवारी सकाळीच शिरले होतं. आणि दुपारनंतर पुराच्या पाण्याने शहरातल्या इतर भागात शिरण्यास सुरुवात केली होती. सायंकाळी सात वाजेपर्यंत शहरातल्या आमराई चौक स्टेशन चौक, फौजदार गल्ली, एसटी स्टँड, पाटणे प्लॉट, राम नगर, भारत नगर, आकाशवाणी केंद्र, शामराव नगर परिसरात पुराचे पाणी शिरले होते. तसेच सांगली -कोल्हापूर रोड हा पाण्याखाली गेला आहे.
ताकारी येथे 4 इंचाने घटली पातळी -
संथ गतीने कृष्णेची पाणी पातळी वाढत असली. तरी दुसर्या बाजूला कृष्णा आणि कोयना धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर कमी झाल्याने कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे. त्यामुळे सांगलीत 54 फुटांपर्यंत पाणी पातळी पोहचली आहे. तर सायंकाळनंतर पाणीपातळी स्थिर होऊन पाणी उतरू लागेल, असे पाटबंधारे विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तर वाळवा तालुक्यातल्या ताकारी येथील कृष्णा नदीची पाण्याची पातळी ही 4 इंचाने घटली आहे. अशी माहिती त्यांनी दिली आहे.
74 रस्ते पाण्याखाली, एसटी सेवा बंद -
जिल्ह्यात पावसा व पुरामुळे आत्तापर्यंत शिराळा, मिरज, वाळवा, पलूस व कडेगाव तालुक्यांमधील एकूण 74 रस्त्यांवरील वाहतूक बंद झाली आहे. त्यामुळे या मार्गावरील एसटी सेवाही बंद करण्यात आली आहे. आतापर्यंत दोन्ही नदी काठच्या जवळपास दहा हजाराहून अधिक कुटुंब आणि वीस हजाराहून अधिक जनावरांचा स्थलांतर झाले आहे. बचावकार्यासाठी जिल्ह्यात 3 एनडीआरएफ पथके कार्यरत आहेत.
हेही वाचा - कोल्हापुराला पुराचा फटका: 7 जणांचा मृत्यू; 14 हजार नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर
हेही वाचा - साताऱ्याच्या पाटणमध्ये भूस्खलनात 21 जणांचा मृत्यू, 8 जण बेपत्ता