ETV Bharat / state

सांगलीला पुन्हा महापूराचा धोका..! कृष्णेची पातळी 52 फुटांपर्यंत जाण्याचा अंदाज - सांगलीत नागरिकांचे स्थलांतर

संततधार पाऊसामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ सुरू आहे. वाढत्या पाणी पातळीमुळे वाळवा तालुक्यातील इस्लामपूर-ताकरी आणि पलूस तालुक्यातील अमणापूर पूल हा रात्री पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद आहे. तर कृष्णा नदीवरील अंकलखोप, मौजे डिग्रज, म्हैसाळ येथील बंधारे आधीच पाण्याखाली गेले आहेत. सांगली शहरात कृष्णा नदीने इशारा पातळी ओलांडली आहे.

सांगलीला पुन्हा महापूराचा धोका
सांगलीला पुन्हा महापूराचा धोका
author img

By

Published : Jul 23, 2021, 10:03 AM IST

सांगली - संततधार पावसामुळे सांगलीच्या कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ सुरू आहे. सांगली मध्ये कृष्णेचे पाणी शहरातील सखल भागात शिरले आहे. आयर्विन पूल या ठिकाणी 40 फूट इशारा पातळी ओलांडली असून आता पाण्याची धोका पातळीकडे वाटचाल सुरू आहे. संततधार पाऊस आणि कोयना धरणातून पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे कृष्णेची पाणी पातळी 10 ते 12 फूटाने वाढून 50 ते 52 फुटांपर्यंत जाण्याचा अंदाज प्रशासनाकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे सांगलीला पुन्हा महापुराचा धोका निर्माण झाला आहे.

कृष्णेची पातळी 52 फुटांपर्यंत जाण्याचा अंदाज

अखेर कृष्णेचे पाणी नागरी वस्तीत ...संततधार पाऊसामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ सुरू आहे. वाढत्या पाणी पातळीमुळे वाळवा तालुक्यातील इस्लामपूर-ताकरी आणि पलूस तालुक्यातील अमणापूर पूल हा रात्री पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद आहे. तर कृष्णा नदीवरील अंकलखोप, मौजे डिग्रज, म्हैसाळ येथील बंधारे आधीच पाण्याखाली गेले आहेत. सांगली शहरात कृष्णा नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. सकाळी साडे आठ वाजता कृष्णा नदीची पाणी पातळी 40 फूट इतकी झाली होती. 40 फूट इशारा तर 45 फूट ही धोका पातळी आहे. त्यामुळे कृष्णाची वाटचाल ही धोका पातळीकडे सुरू झालेली आहे.
सांगलीला पुन्हा महापूराचा धोका.

कृष्णा नदीच्या वाढलेल्या पाणी पातळीमुळे पाणी शहरातल्या सखल भागात शिरू लागले आहे. जुना नांद्रे -कर्नाळ रस्ता हा पाण्याखाली गेला आहे, तर सूर्यवंशी प्लॉट या ठिकाणी पाणी शिरले आहे. गुरुवारी रात्री पासून भिलवडीच्या मौला नगरसह सांगली शहरातील पूरपट्ट्यातील सुमारे 150 हुन अधिक कुटुंबांनी स्थलांतर केले आहे. पाण्याची वाढती पातळी आणि नागरी वस्तीत पाणी शिरू लागल्याने पूरपट्टयातील नागरिकांनी स्वतःहून स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे.

सांगलीला पुन्हा महापुराचा धोका..

संततधार पाऊस आणि कोयना धरणातुन करण्यात येणाऱ्या विसर्गामूळे कृष्णेची पाणी पातळी 40 फुटांपर्यंत जाण्याचा अंदाज पाटबंधारे विभागाकडून वर्तविण्यात आला होता. मात्र कृष्णा नदी पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाची संततधार कायम असल्याने व कोयना धरणातुन सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळी मध्ये आणखी 10 ते 12 फुटाने वाढ होऊन,सांगली मध्ये कृष्णा नदीची पाण्याची पातळी 50 ते 52 फुटांपर्यंत जाण्याचा अंदाज जिल्हा प्रशासनाच्या वतीने वर्तविण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना अति सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे

वारणा नदीला आला पूर..

दुसऱ्या बाजूला वारणा नदीच्या पाणी पातळीतही झपाट्याने वाढ कायम आहेत. चांदोली धरणातून सुरू असलेला विसर्ग आणि संततधार पाऊस यामुळे वारणा नदी पात्रा बाहेर पडलेली आहे. शिराळा तालुक्यातील वारणा नदीवरील जवळपास तीन पूल आणि 9 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे इथला कोल्हापूर जिल्ह्याशी असणारा जवळचा संपर्क तुटला आहे. चांदोली धरणातून सुरू असलेला विसर्ग आणि पाऊस यामुळे वारणा नदीच्या पाणीपातळीत आणखी वाढ होणार आहे. या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.