ETV Bharat / state

कोयना,चांदोली धरणातून पाण्याचा विसर्ग; कृष्णा-वारणेच्या पाणी पातळीत वाढ; प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा...

कोयना धरणातून 19 हजार 226 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, कृष्णा व वारणा नद्यांची पूरस्थिती कायम आहे.

कोयना धरणातून 19 हजार 226 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.
author img

By

Published : Aug 3, 2019, 11:29 PM IST

Updated : Aug 3, 2019, 11:50 PM IST

सांगली - कोयना धरणातून 19 हजार 226 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, कृष्णा व वारणा नद्यांची पूरस्थिती कायम आहे. चांदोली धरणातूनही 13 हजार क्युसेक पाणी सोडल्याने जिल्ह्यातील कृष्णा आणि वारणा नद्यांच्या पाणी पातळीत आणखी वाढ झाली आहे.

शिराळा तालुक्यात पावसाची संततधार कायम असल्याने वारणा नदीला पूर आला आहे. तसेच चांदोली धरण पाणलोट क्षेत्रामध्ये आठ दिवसांपासून अतिवृष्टी कायम असल्याने हे धरण भरले असून, 34.40 टी.एम.सी. पैकी 32.33 टी.एम.सी. पाणीसाठा झाला आहे.

सततच्या पावसाने वारणा नदीकाठचे जवळपास हजारो एकर शेतजमीन पाण्याखाली गेली आहे. त्याचसोबत शिराळा आणि वाळवा तालुक्यातील वारणा नदीवरील पाच छोटे बंधारे,तीन पूल पाण्याखाली आहेत. यामुळे कोल्हापूर जिल्ह्याजवळील काही गावांचा संपर्क तुटला आहे.

कोयना धरणातून 19 हजार 226 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.

कृष्णा नदीतील वाळवा तालुक्यातील बहे-बोरगाव व पलूस तालुक्यातील आमणापूर येथील पूल पाण्याखाली गेले आहेत. सांगलीत कृष्णा नदीची पाणी पातळी 37.06 फुटांवर पोहोचली आहे. यामुळे सांगली शहरातील नदीकाठच्या सखल भागातील दत्तनगर, सूर्यवंशी प्लॉट या ठिकाणी पुराचे पाणी घुसले आहे. दोन दिवसांपासून या ठिकाणच्या अनेक घरांना पुराचा फटका बसला असून, महानगरपालिका प्रशासनाने स्थानिक नागरिकांचे पालिकेच्या शाळांमध्ये स्थलांतर केले आहे. पालिका प्रशासनाने संबंधित ठिकाणी पूर नियंत्रण व आपत्ती व्यवस्थापन पथके कार्यान्वित केली आहेत.

कृष्णेच्या पाणलोट क्षेत्रातील पावसाची संततधार कायम असल्याने पूर पातळीत आणखी वाढ होणार आहे. सांगली शहरात पावसाचे प्रमाण कायम राहिल्यास सोमवारी (दि. ५ जुलै) रोजी कृष्णेची पाणीपातळी दीड ते दोन फूट वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Intro:सरफराज सनदी- सांगली.

Av

Feed send file name - mh_sng_03_pur_sthiti_vis_1_7203751 .-mh_sng_03_pur_sthiti_byt_2_7203751

स्लग -कोयना,चांदोली धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू,कृष्णा-वारणा नद्यांच्या पूर पातळीत होणार आणखी वाढ,सतर्क राहण्याचा इशारा...

अँकर - कृष्णा आणि वारणा नद्यांची पूरस्थिती कायम आहे.वारणेच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.तर कृष्णाची पाणीपातळी मध्ये हळूहळू वाढ होत,असून सांगलीत कृष्णा नदीची पाणीपातळी 37.06 फुटांवर पोहोचली आहे.कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू केल्याने कृष्णा नदीच्या पाणी पातळीत आणखी वाढ होणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.Body:अतिवृष्टी,संततधार पाऊस आणि धरणात
चांदोली व कोयना धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे सांगली जिल्ह्यातील कृष्णा आणि वारणा नद्यांना पूर आला आहे.

शिराळा तालुक्यात पावसाची संततधार कायम आहे.त्यामुळे वारणा नदीला पूर आला आहे.तर चांदोली धरण पाणलोट क्षेत्रामध्ये आठ दिवसांपासून अतिवृष्टी कायम आहे.त्यामुळे चांदोली धरण भरलं असून 34.40 क्षमता असणाऱ्या धरणात 32.33 टी.एम.सी.पाणीसाठा झाला असून अतिवृष्टीमुळे भरलेल्या चांदोली धरणातून सोडण्यात येणाऱ्या 13 हजार क्युसेक्स पाण्यामुळे वारणा
नदीच्या पूर पातळीत आणखी वाढ होऊन वारणेचे पात्र आणखी विस्तीर्ण झालं आहे. त्यामुळे वारणा नदीकाठची जवळपास हजारो एकर शेतीचे क्षेत्र पाण्याखाली गेले आहे.त्याचबरोबर शिराळा आणि वाळवा तालुक्यातील वारणा नदीवरील पाच छोटे बंधारे,तीन पूल पाण्याखाली आहेत. यामुळे कोल्हापूर जिल्ह्याचा जवळचा असणारा संपर्क तुटला आहे. तर शिराळा तालुक्यातील अनेक ओढे-नाल्याना सुद्धा पूर आला आहे.त्यामुळे याठिकाणी वाड्या-वस्त्यांचा जवळचा संपर्क तुटला आहे.

दुसऱ्या बाजूला कृष्णा कृष्णा नदीला पूर आला आहे.कृष्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रात पाऊसाची संततधार कायम आहे. त्यामुळे कृष्णा नदीतील पाणीपातळीमध्ये वाढ होत आहे.परिणामी कृष्णा नदीतील वाळवा तालुक्यातील बहे बोरगाव, व पलूस तालुक्यातील आमणापूर येथील पूल पाण्याखाली गेले अहेत,त्यामुळे याठिकाणी जवळच्या गावांचा एकमेकांशी संपर्क तुटला आहे.तरी या नदीवरील असणारे छोटे बंधारे सुद्धा पाण्याखाली गेले आहेत.कसबेडिग्रज,सांगली आणि म्हैसाळ येथील बंधारे गेल्या पाच दिवसांपासून पाण्याखाली आहेत. पाण्याच्या पातळीमध्ये घट आणि वाढ गेल्या तीन दिवसांपासून सुरू आहे.सध्या सांगलीतली पाण्याची पातळी रविवारी 8.30 वाजता 37.06 फुटांवर पोहचली आहे.यामुळे सांगली शहरातील नदीकाठच्या सखल भाग असणाऱ्या शहरातल्या दत्तनगर, सूर्यवंशी प्लॉट या ठिकाणी पुराचं पाणी घुसले आहे.दोन दिवसांपासून या ठिकाणी इथल्या 30 हून अधिक घरांना पुराचा विळखा बसला आहे.या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाने येथील नागरिकांना सुरक्षित पणे पालिकेच्या शाळांमध्ये स्थलांतर केला आहे.तर या ठिकाणी असणारा कर्नाळ रोड पाण्याखाली गेला आहे.पालिका प्रशासनाकडून या ठिकाणी पूर नियंत्रण व आपत्ती व्यवस्थापन पथके कार्यान्वित करण्यात आली आहेत.

तर सातारा जिल्ह्यातील कोयना धरणातून 19 हजार 226 क्यूस्केस पाण्याचा विसर्ग रविवारी सायंकाळपासून कृष्णा नदीत करण्यास सुरवात झाली आहे. तर कृष्णाच्या पाणलोट क्षेत्रातील पावसाची संततधार कायम असल्याने कृष्णेच्या पूर पातळीत आणखी वाढ होणार आहे, सोमवारी कृष्णाची पाणीपातळी सांगली मध्ये दीड ते दोन फुटाने वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
संततधार पाऊस आणि चांदोली वकोयना धरणातून सोडण्यात येणारे पाणी ,यामुळे वारणा आणि कृष्णा नदीच्या पूर पातळीत आणखी वाढ होणार असल्याने नदीकाठच्या गावांनी आणि वाडीवस्तीवर नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा पाटबंधारे प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

बाईट - संगीता खोत - महापौर - सांगली.Conclusion:
Last Updated : Aug 3, 2019, 11:50 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.