ETV Bharat / state

सलग दुसऱ्या वर्षीही कोरोनामुळे ख्वाजा मिरासाहेब दर्गा उरूस रद्द - Sangli District Latest News

हिंदू-मुस्लीम ऐक्याचं प्रतीक असणाऱ्या मिरजेतील ख्वाजा मिरासाहेब दर्गा उरूस यंदाही रद्द झाला आहे. प्रशासन आणि दर्गा कमिटीमध्ये पार पडलेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सलग दुसऱ्यांदा हा उरूस रद्द करण्यात आला आहे.

कोरोनामुळे ख्वाजा मिरासाहेब दर्गा उरूस रद्द

author img

By

Published : Mar 2, 2021, 2:24 AM IST

सांगली - हिंदू-मुस्लीम ऐक्याचं प्रतीक असणाऱ्या मिरजेतील ख्वाजा मिरासाहेब दर्गा उरूस यंदाही रद्द झाला आहे. प्रशासन आणि दर्गा कमिटीमध्ये पार पडलेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सलग दुसऱ्यांदा हा उरूस रद्द करण्यात आला आहे.

मिरजेतील ख्वाजा मिरासाहेब दर्गाचा यंदा 646 वा उरूस 9 मार्चपासून सुरू होणार होता. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दुसऱ्यांदा या उरूस रद्द करण्यात आला आहे. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे शासनाकडून विविध उपाययोजना राबवण्यात येत असून, सभा, यात्रा, धार्मिक उत्सवाच्या आयोजनावर बंदी घालण्यात आल्याने, हा उरूस रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

कोरोनामुळे ख्वाजा मिरासाहेब दर्गा उरूस रद्द

उरूस रद्द, भाविकांना प्रवेश बंदी

मिरजेचे प्रांताधिकारी समीर शिंगोटे यांच्या अध्यक्षतेखाली दर्गा कमिटी आणि पोलीस प्रशासन यांच्यामध्ये उरूस बाबत बैठक संपन्न झाली, यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन, यंदाचा उरूस रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या वर्षी देखील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उरूस रद्द करण्यात आला होता. दरवर्षी उरूसाच्या निमित्ताने महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात या राज्यातून लाखो भाविक मिरजमध्ये येत असतात. उरुसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते, मात्र यावर्षी उरूस रद्द करण्यात आला असून, भाविकांना देखील ख्वाजा मीरासाहेब दर्गामध्ये प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे भाविकांनी कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन प्रांताधिकारी समीर शिंगोटे यांनी केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.