ETV Bharat / state

Karnataka took bus back : कर्नाटकने नुकसान भरपाई भरुन जप्त केलेली बस वापस नेली

author img

By

Published : Apr 18, 2022, 3:36 PM IST

Updated : Apr 19, 2022, 2:44 PM IST

एका अपघाता प्रकरणी नुकसान भरपाईचे आदेश देऊनही भरपाई देण्यास टाळाटाळ करणाऱ्या कर्नाटक एसटी मंडळाला सांगली न्यायालयाने ( Sangli Court ) दणका दिला आहे. थेट कर्नाटक मंडळाची बस जप्त करून मृत कुटुंबाच्या ताब्यात दिली ( Karnataka ST Bus Seized For Compensation ). नंतर मंडळाने संबंधित कुटुंबाला आरटीजीएसच्या माध्यमाने पैसे दिल्या नंतर बस वापस नेली.

कर्नाटक एसटीची बस जप्त
कर्नाटक एसटीची बस जप्त

सांगली - अपघातप्रकरणी नुकसान भरपाईचे आदेश देऊनही भरपाई देण्यास टाळाटाळ करणाऱ्या कर्नाटक एसटी मंडळाला सांगली न्यायालयाने ( Sangli Court ) दणका दिला. थेट बस जप्त करून मृत कुटुंबाच्या ताब्यात दिली ( Karnataka ST Bus Seized For Compensation ) होती. मिरज शहरात 2015 साली कर्नाटक परिवहन मंडळाच्या बसच्या धडकेत भानुदास भोसले यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी भोसले कुटुंबाकडून नुकसान भरपाईसाठी सांगली न्यायालयात दावा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात कर्नाटक एसटी मंडळाला मृत भोसले यांच्या कुटुंबियांना 8 लाख 33 हजार 563 रुपये देण्याचे आदेश 2020 साली दिले होते. मात्र, कर्नाटक महामंडळाकडून नुकसानभरपाई रक्कम देण्यात आली नाही. त्यामुळे बस जप्त करुन भोसले कुटुंबियांना देण्यात आली होती. त्यानंतर कर्नाटक परिवहन महामंडळाने नुकसानीची रक्कम भरुन बस परत नेली.

माहिती देताना वकील

नंतर मृत भोसले यांच्या पत्नी विजया यांनी सांगली न्यायालयामध्ये ही बाब निदर्शनास आणून दिली. त्यानंतर सांगली न्यायालयाने अपघातातील एसटी बस किंवा कर्नाटक महामंडळाची कोणतीही एसटी बस जप्त करण्याचे आदेश दिले. त्यानुसार कर्नाटक महामंडळाची बेलहोंगल आगाराची बस जप्त करत भोसले यांच्या कुटुंबियांना दिली. त्यामुळे आम्हाला न्याय मिळेल याची खात्री मृत भानुदास भोसले यांचे चिरंजीव अभय भोसले यांनी व्यक्त केली.

दरम्यान कुटुंबाला आरटीजीएस पेमेंट केल्यानंतर बस सोडवण्यात आल्याची माहिती बेळगावचे विभागीय नियंत्रक पी वाय नाईक यांनी 'ईटीव्ही भारत'ला माहिती दिली. उत्तर पश्चिम कर्नाटक रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन (NWKRTC) ने तीन दिवसांपूर्वी नुकसान भरपाईचा धनादेश दिला होता, परंतु कुटुंबाने तो RTGS मध्ये देण्याची मागणी केली. रक्कम आरटीजीएस करून बस सोडण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. कोविड परिस्थितीमुळे महामंडळ तोट्यात आहे आणि त्यामुळे भरपाई देण्यास विलंब झाला, असे ही त्यांनी सांगितले.

हेही वाचा - Bike Accident Sangli : भरधाव डंपरच्या धडकेत पिता-पुत्र जागीच ठार

Last Updated : Apr 19, 2022, 2:44 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.