सांगली : महाराष्ट्राच्या सीमेवर असणाऱ्या जत तालुक्यातील 42 गाव (preparing to claim 42 villages in Jat taluka) हे कर्नाटक (Karnataka) मध्ये येण्याच्या तयारीत असल्याचा गौप्यस्फोट कर्नाटकचे मुख्यमंत्री बोमय्या (Karnataka Chief Minister Basavaraj Bommai) यांनी करत, जत तालुक्यावर दावा केला आहे. त्यानंतर सांगलीतील (Sangli District) जत तालुका कर्नाटकमध्ये जाणार का ? याबाबत उलट सुलट चर्चेला उधान आले आहे. मात्र जत तालुक्यातील कोणतीही गावं कर्नाटक मध्ये जाणार नसल्याचं चित्र, सध्याच्या घडीला पाहायला मिळत आहे.
नागरीकांची भूमिका : सांगलीच्या जत तालुक्यातील 65 गावांनी पाणीच्या प्रश्नावरून 2013 - 14 साली मोठं आंदोलन उभं केलं होतं, मुंबईत पर्यंत पदयात्रा देखील काढली होती. त्यानंतर 42 गावातल्या ग्रामस्थांनी जत ते सांगली अशी दीडशे किलोमीटर ची पायी दिंडी देखील काढली. 'पाणी द्या नसेल तर, आम्हाला महाराष्ट्रात जाण्यासाठी परवानगी द्या',अशी भूमिका घेत नागरीकांनी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केलं होतं. पाणी देणार नसेल तर आम्हाला कर्नाटक मध्ये जाण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी करत गावागावातील ग्रामपंचायत मध्ये कर्नाटक राज्यात जाण्याचा ठराव देखील करण्यात आला होता.
मुद्दा सोडून दिला : मात्र तत्कालीन भाजपा युतीच्या सरकारने म्हैसाळ विस्तारित योजनेतून पाणी देण्याचा आश्वासन दिलं होतं. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी विस्तारित योजनेसाठी 32 कोटींचा निधी देखील मंजूर केला होता. आणि त्या दृष्टीने योजना देखील सुरू केली. योजनेतील बरेच कामं पूर्ण झाले आहे. त्यामुळे काही भागांमध्ये पाणीदेखील पोहचलेले आहे. त्याचवेळी गेल्या काही वर्षांमध्ये पाऊस देखील राज्यात चांगला राहिला आहे. त्याचबरोबर कर्नाटक राज्यातल्या तुबची बबलेश्वर योजनेतून ओव्हरफ्लो होणारं पाणी देखील जत तालुक्यात पोहोचत आहे. त्यामुळे आता तालुक्यातल्या पाण्याचा प्रश्न म्हणावं तितका गंभीर राहिला नाही. त्यामुळे या गावांनी आता जवळपास कर्नाटक मध्ये जाण्याचा मुद्दा सोडून दिल्याचे, भाजपाचे तालुक्यातील नेते आणि जिल्हा परिषद सदस्य तमन्ना रवी पाटील यांनी सांगितला आहे.
कर्नाटकमध्ये जाण्याचा प्रश्न उरलेला नाही : तर मुख्यमंत्री बोमया यांनी केलेलं विधान म्हणजे पुतना मावशीचे प्रेम असून; कर्नाटक सरकारकडून जरी याबाबतीत सांगण्यात आलं असलं, तरी तशी परिस्थिती आता जत तालुक्यातल्या कोणत्या गावांमध्ये नाही. पाण्याची मुबलकता झालेली आहे. चांगला पाऊसमान आणि म्हैसाळ योजनेचे पोहचलेले पाणी यामुळे कर्नाटक राज्यामध्ये जाण्याचा आता कोणताच प्रश्न उरलेला नाही, असे मत जत तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार व राजकीय विश्लेषक दिनराज वाघमारे यांनी मांडले आहे. तसेचं निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कर्नाटककडून,अशा प्रकारची विधाने करण्यात येत असल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे.
कोणतीच इच्छा आता नाही : राज्य सरकारच्या वतीने पाण्याच्या प्रश्नाबाबत, जत तालुक्यातील 65 गावांना आंदोलनानंतर पाणी देण्याची ग्वाही दिली होती. ती योजना देखील सुरू करण्यात आली. मात्र अजूनही म्हणावा तितका पाण्याचा प्रश्न सुटला नाही आणि प्रश्न आजही कायम आहे, असं जरी असलं तरी महाराष्ट्रातून कर्नाटक मध्ये जाण्याची कोणतीच इच्छा आता नाही. आणि राज्य सरकारनेही आता हा प्रश्न मिटवावा, असं मत पाणी संघर्ष चळवळीचे कार्यकर्ते सुभाष कोकळे यांनी व्यक्त केले आहे.