सांगली : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपवर टीका केली आहे. मिरजेतील पाडकाम प्रकरणात पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी सामील असून भाजपा सत्तेचा गैरवापर करत असल्याचा गंभीर आरोपही आमदार जयंत पाटील यांनी केला आहे, ते सांगलीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे दर्शन प्रसंगी प्रसार माध्यमांशी बोलत होते.
प्रशासनाला हाताशी धरले : मिरजेत भाजपा आमदाराच्या भावाने केलेला प्रकार हा प्रशासनाला हाताशी धरूनच केल्याचा आरोप केला. मिरजेतील पाडकाम प्रकरणात पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी सामील असल्याचा जयंत पाटलांचा आरोप करत भाजपाकडून सत्तेचा गैरवापर होत असल्याची टीकाही जयंत पाटलांनी यावेळी केली.
पंतप्रधानांकडे चांगले गुण : पंतप्रधान मोदींची स्वामी विवेकानंद यांच्याशी तुलना केल्याबद्दल, बोलताना जयंत पाटील म्हणाले की, पंतप्रधान मोदींची स्वामी विवेकानंद यांच्याशी केलेली तुलना यात आक्षेप घेण्यासारखे काय ? असे स्पष्ट करीत मोदींकडे सुद्धा चांगले गुण आहेत. यावेळी जयंत पाटील यांच्याकडून स्वामी विवेकानंद यांच्याबरोबर मोदींच्या केलेल्या तुलनेचे एक प्रकारे समर्थन केले गेल्याचे पाहायला मिळाले.
हेही वाचा : Nana Patole Criticized BJP : दुसऱ्यांचे घर फोडताना भाजपला आनंद, त्यांचे घर फुटेल तेव्हा दुःख कळेल - नाना पटोले
मिरजमधील पाडकाम प्रकरण : सांगलीतील मिरज मधील बस स्टँडजवळील परिसरात ६ जानेवारी रोजी रस्त्याशेजारील दोन हॉटेल, एक मेडिकल स्टोअरसह सात मिळकती पाडण्यात आल्या होत्या. मध्यरात्री जेसीबीच्या सहाय्याने दुकाने आणि घरे पाडण्यात आली होती. दरम्यान, या पाडकामानंतर भाजपचे विधान परिषद आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू ब्रह्मानंद पडळकर हे या जागेचा ताबा घेण्यासाठी आले होते, असा आरोप स्थानिकांनी केला आहे.