सांगली - जतचे नवे उपविभागीय पोलीस अधिकारी रत्नाकर नवले यांनी कार्यभार हाती घेताच अवैद्य धंद्यावर कारवाई करत पहिला दणका दिला आहे. या कारवाईमुळे अवैधरित्या मद्य वाहतूक व विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. उपविभागीय पोलीस कार्यालय हद्दीत जत, कवठेमहांकाळ, उमदी पोलीस ठाणेकडील अवैध धंदयावर कारवाई करणे बाबत पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम व अपर पोलीस अधिक्षक मनिषा दुबुले यांच्या आदेशाने प्रभावी कारवाई करण्याबाबत सुचना देण्यात आल्या होते.
त्या अनुषंगाने जत पोलीस ठाणेच्या हददीत वळसंग गावामध्ये अनिल विठठल केंगार (रा.वळसंग ता.जत) हा त्यांच्या घराशेजारी असलेल्या झोपडीमध्ये बेकायदेशीर दारु विक्री करीत असल्याची माहिती खबऱ्याकडून माहिती मिळाली होती. त्याअनुषंगाने उपविभागीय पोलीस अधिकारी रत्नाकर नवले यांच्या आदेशाने त्यांच्या कार्यालयाकडील पोलीस नाईक विजय अकुल, पोलीस नाईक सुनिल व्हनखंडे, पोलीस नाईक वाहीदअली मुल्ला, पोलीस नाईक अभिजीत यमगगर यांनी आज शनिवारी सायंकाळी 5 च्या सुमारास छापा टाकून सदर छाप्यात एकूण ६ देशी संत्र कंपनीच्या बॉक्स २ विदेशी कंपनीच्या बॉक्स त्यामध्ये एकुण २८१ देशी बाटल्या व विदेशी ५४ बाटल्या, असा एकुण २६,३४० रुपयेचे मुद्देमाल जप्त करण्यात आलेली आहे. सदर घटनेबाबत जत पोलीस ठाणे येथे दारुबंदी अधिनियम प्रमाणे आरोपी अनिल विठठल केंगार यांच्या विरुदधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास जत पोलीस करत आहेत.
जतमध्ये अवैध धंद्यांवर कारवाई
उपविभागीय पोलीस अधिकारी रत्नाकर नवले यांनी कार्यभार हाती घेताच अवैद्य धंद्यावर कारवाई करत पहिला दणका दिला आहे.या कारवाईमुळे अवैधरित्या मद्य वाहतूक व विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.