ETV Bharat / state

चक्क नगरपालिकेच्या दारात भरला भाजीबाजार, मंडई स्थलांतरावरून इस्लामपूर नगरपालिकेचा निषेध - इस्लामपूर नगरपालिकेच्या दारात भरवला भाजी बाजार

इस्लामपूरमध्ये भाजी मंडई स्थलांतरावरून सध्या वाद सुरू आहे. पालिकेकडून भाजी मंडईमध्ये विक्रीसाठी मनाई करण्यात आली आहे. यामुळे संतप्त भाजी विक्रेते व शेतकऱ्यांनी थेट इस्लामपूर नगरपालिका कार्यालयात जाऊन पालिकेच्या आवारात चक्क भाजी बाजार भरवला होता.

vegetable  Mandai migration
vegetable Mandai migration
author img

By

Published : Feb 6, 2021, 3:22 PM IST

Updated : Feb 6, 2021, 3:28 PM IST

सांगली - इस्लामपूरमध्ये भाजी मंडई स्थलांतरावरून सध्या वाद सुरू आहे. पालिकेकडून भाजी मंडईमध्ये विक्रीसाठी मनाई करण्यात आली आहे. यामुळे संतप्त भाजी विक्रेते व शेतकऱ्यांनी थेट इस्लामपूर नगरपालिका कार्यालयात जाऊन पालिकेच्या आवारात चक्क भाजी बाजार भरवला होता.

चक्क नगरपालिकेच्या दारात भरला भाजीबाजार
जुनी गणेश भाजी मंडई स्थलांतरावरून वाद ?इस्लामपूर शहरातील गणेश भाजी मंडईच्या स्थलांतर मुद्द्यांवरून नगरपालिका आणि भाजी विक्रेते यांच्यात संघर्ष सुरू झाला आहे. गेल्या आठवड्यापासून नगरपालिका प्रशासनाने चौका-चौकात जुनी भाजी मंडई नव्या प्रशस्त जागेत पाच फेब्रुवारीपासून स्थलांतरित होणार असल्याचे फलक लावले होते. यामुळे आज सकाळपासून जुन्या मंडईत पोलीस बंदोबस्त होता. कोणत्याही विक्रेत्यांना बसू दिले नाही. तसेच नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी काही जणांचा भाजीपाला जप्त केला. यानंतर विक्रेत्यांना स्थलांतरित जागेत जाण्याची विनंती करण्यात आली. पण त्यांनी ती धुडकावली.पालिकेच्या दारात भरला भाजी बाजार -दरम्यान पोलिसांचा बंदोबस्त आणि पालिका प्रशासनानाच्या कारवाईनंतर भाजी विक्रेत्यांनी थेट इस्लामपूर नगरपालिकेत धाव घेतली. विक्रेत्यांनी जुन्या जागेवरचा व्यवसाय करण्याची भूमिका मांडत, पालिका प्रशासनाच्या कारवाईचा निषेध करत पालिकेच्या कार्यालयाच्या आवारात चक्क भाजी बाजार भरवला. सुमारे 2 तास यावेळी विक्रेते आणि शेतकऱ्यांनी ठाण मांडून भाजी विक्रीचा व्यवसाय केला. तर माजी नगरसेवक कपिल ओसवाल यांनी विक्रेत्यांचे नेतृत्व करत प्रशासनाने हा निर्णय बदलावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.

Last Updated : Feb 6, 2021, 3:28 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.