ETV Bharat / state

नो शक्ती प्रदर्शन,नो कार्यकर्ते, अशा माहोलात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सांगलीतील इच्छुकांच्या मुलाखती

author img

By

Published : Jul 24, 2019, 10:21 PM IST

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयाकडून उमेदवारांना कोणतेही शक्ती प्रदर्शन न करता, केवळ मुलाखती देण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. तरीही काही उमेदवारांनी कार्यकर्त्यांना घेऊन शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी मागितल्याचे अभिमानाने सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेस इच्छुकांच्या मुलाखती

सांगली- जिल्ह्यातील 8 विधानसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. 19 जणांनी पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली होती. फारसा गाजावाजा न करता इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. यामुळे नो शक्ती प्रदर्शन, नो कार्यकर्ते अशा वातावरणात पार पडलेल्या मुलाखतींना, राष्ट्रवादी नेत्यांनी मात्र उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे सांगितले.

सुरेश घुले, पक्ष निरीक्षक, राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जिल्ह्यातील विधानसभा इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आज सांगलीमध्ये पार पडल्या. पक्षाच्या कार्यालयात माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, सांगली जिल्ह्याचे पक्ष निरीक्षक व राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश घुले, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, विधानसभा क्षेत्राध्यक्ष कमलाकर पाटील या नेत्यांनी जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघासाठी मुलाखती घेतल्या.

पलूस-कडेगाव मतदारसंघातून जिल्हा परिषद सदस्य शरद लाड, इस्लामपूर मतदारसंघातून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, शिराळा विधानसभा मतदारसंघातून मानसिंगराव नाईक आणि तासगाव-कवठेमंहाकाळ मतदारसंघातून आमदार सुमनताई पाटील या चौघांनी तर इतर चार मतदारसंघातुन 15 जणांनी असे एकूण 19 जणांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडे उमेदवारी देण्याची मागणी केली आहे. तर सांगली विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष विनया पाठक यांनी एकमेव उमेदवारी मागितली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या यापूर्वी विधानसभेसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती प्रसंगी प्रत्येक मतदारसंघातून दिग्गज नेत्यांसह शेकडो पदाधिकाऱ्यांची उमेदवारी मागणीसाठी भाऊगर्दी व्हायची. विशेष म्हणजे मुलाखतीच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाला उमेदवारांच्या शक्ती प्रदर्शनामुळे जत्रेचे स्वरूप प्राप्त व्हायचे. त्यामुळे उमेदवारी कोणाला द्यायची ? असा राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या समोर पेच निर्माण व्हायचा. पण यावेळी घेण्यात आलेल्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीवेळी अशी स्थिती जाणवली नाही. तुरळक प्रमाणात गर्दी दिसून आली, ना कोणती घोषणाबाजी, ना कार्यकर्त्यांची गर्दी, अशा परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या.

Intro:सरफराज सनदी - सांगली .

Avb

Feed send file name - mh_sng_06_ncp_candidate_interview_vis_1_7203751 - to - mh_sng_06_ncp_candidate_interview_byt_4_7203751

स्लग - नो शक्ती प्रदर्शन,नो कार्यकर्ते, शुकशुकाटाच्या वातावरणात पार पडल्या,
राष्ट्रवादीच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती.

अँकर - फारसा गाजावाजा न करता पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधानसभा इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीला संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे.जिल्ह्यातील आठ मतदारसंघातून अवघ्या १९ जणांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडे उमेदवारीची मागणी केली आहे.नो शक्ती प्रदर्शन,नो कार्यकर्ते अश्या शुकशुकाटाच्या वातावरणात पार पडलेल्या मुलाखतीला,राष्ट्रवादी नेत्यांनी
मात्र उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे आवर्जून सांगितले.Body:आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कडून विधानसभा इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आज सांगलीमध्ये पार पडल्या आहेत.पक्षाच्या राष्ट्रवादी कार्यालयातमाजी मंत्री अण्णासाहेब डांगे, सांगली जिल्ह्याचे पक्ष निरीक्षक व राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश घुले,सांगली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष अविनाश पाटील, विधानसभा क्षेत्राध्यक्ष कमलाकर पाटील या नेत्यांनी जिल्ह्यातल्या आठ विधानसभा मतदार संघासाठी मुलाखतीत घेतल्या. ज्यामध्ये पलूस-कडेगाव मतदारसंघातून जिल्हा परिषद सदस्य शरद लाड, इस्लामपूर मतदारसंघातून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील,शिराळा विधानसभा मतदारसंघातून मानसिंगराव नाईक आणि तासगाव-कवठेमंहाकाळ मतदारसंघातून आमदार सुमनताई आर आर पाटील या चौघांनी उमेदवारी मागितली तर इतर चार मतदारसंघातुन १५ जणांनी असे एकूण १९ जणांनी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी कडे उमेदवारी देण्याची मागणी केली आहे.उमेदवारी मागितली आहे.तर सांगली विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष विनया पाठक यांनी एकमेव उमेदवारी मागितली आहे. यापूर्वीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधानसभा इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे प्रत्येक मतदारसंघातून दिग्गज नेत्यांच्या सह शेकडो पदाधिकाऱ्यांची उमेदवारी मागणीसाठी भाऊ गर्दी व्हायची,विशेष म्हणजे मुलाखतीच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाला उमेदवारांच्या शक्ती प्रदर्शनामुळे जत्रेचे स्वरूप प्राप्त व्हायचं, त्यामुळे उमेदवारी कोणाला द्यायची ? याचा राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या समोर पेच निर्माण व्हायचा,पण आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखत अशी कोणती स्थिती आज जाणवली नाही.तुरळक प्रमाणात गर्दी दिसून आली, ना तर कोणती घोषणाबाजी ना तर कार्यकर्त्यांची गर्दी अशा या सर्व परिस्थिती मध्यये राष्ट्रवादी काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या,तर राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून,यावेळी प्रदेश कार्यालयाकडून उमेदवारांना कोणतेही शक्ती प्रदर्शन न करता,केवळ मुलाखती देण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या, मात्र तरीही काही उमेदवारांनी कार्यकर्त्यांना घेऊन शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी मागितल्याचा अभिमानानं सांगत जिल्ह्यातल्या आठही मतदारसंघात उमेदवारीसाठी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचं राष्ट्रवादीच्या नेत्यांच्याकडून सांगण्यात आले.असे असले तरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आज पार पडलेल्या विधानसभा इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीचा माहोल जिल्ह्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अवस्था काय आहे,हे सांगणारा होता.

बाईट - सुरेश घुले - पक्ष निरीक्षक - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी.
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.