ETV Bharat / state

शिक्षक 'सुधीर बंडगर' यांचा प्रेरणादायी नवोपक्रम, राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

author img

By

Published : Jan 4, 2021, 7:42 AM IST

ऐन कोरोनाच्या काळात विद्यार्थी शिक्षण प्रवाहात राहावेत यासाठी सांगलीतील शिक्षकाने प्रयत्नांची पराकाष्ठा केली. नवीन उपक्रम राबवत विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची सोय केली. त्यांच्या या नवोपक्रमाची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. डोंगरी, दुर्गम, जंगल भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसह क्रीडा प्रसारासाठी त्यांनी विविध उपक्रम राबवले.

शिक्षक 'सुधीर बंडगर' यांचा प्रेरणादायी नवोपक्रम

सांगली - कोरोना काळात जनजीवन ठप्प झाले. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची गैरसोय झाली. मात्र, अशा कठीण परिस्थितीतही हार न मानता काही शिक्षकांनी ज्ञानगंगा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. सांगली जिल्ह्यातील आरळा (ता. शिराळा) येथील उपक्रमशील शिक्षक सुधीर रामचंद्र बंडगर यांनी कोरोना काळात विद्यार्थ्यांसाठी नवीन उपक्रम राबवला. त्यांनी हा नवोपक्रम शासनाच्या राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांना सादर केला होता. उल्लेखनीय म्हणजे, त्यांच्या या उपक्रमाला जिल्हास्तरीय शासकीय स्पर्धेत तृतीय क्रमांकही मिळाला. यासह त्यांच्या या नवोपक्रमाची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवडही करण्यात आली आहे.

सुधीर बंडगर
सुधीर बंडगर

कोरोना काळातही विद्यार्थ्यांचे शिक्षण अविरत सुरू

'सुधीर बंडगर', हे शिराळा येथील हायर एज्युकेशन सोसायटी संचलित गांधी सेवाधाम माध्य. व उच्च माध्य. विद्यालय आरळा, येथे क्रीडाशिक्षक पदावर कार्यरत आहेत. डोंगरी, दुर्गम, जंगल भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसह क्रीडा प्रसारासाठी ते अनेक उपक्रम राबवित असतात. कोरोना काळातही विद्यार्थ्यांचे शिक्षण अविरत सुरू राहावे यासाठी त्यांनी विविध उपक्रम यशस्वीरित्या राबवले. कोरोना काळात शासनाचा 'शाळा बंद पण शिक्षण सुरू' हा उपक्रम डोंगरी भागात त्यांनी प्रभावीपणे राबविला. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांनी घेतलेल्या माध्यमिक मुख्याध्यापक व शिक्षक गटामध्ये त्यांनी हा नवोपक्रम सादर केला होता.

'सुधीर बंडगर' यांचा प्रेरणादायी नवोपक्रम

जिल्हास्तरावर तृतीय क्रमांक प्राप्त या नवोपक्रमाची राज्यस्तरावर निवड झाली आहे. कोरोना काळात विद्यार्थ्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी त्यांनी विद्यार्थ्यांकडून नियमित व्यायाम करवून घेतला. यासह योग व सूर्यनमस्कार स्पर्धासुद्धा आयोजित केल्या. लॉकडाऊन काळातही केंद्र शासनाचा फिट इंडिया उपक्रम सुरू ठेवत डोंगरी ग्रामिण भागात हा उपक्रम पोहोचवला. आहार, व्यायाम व योगाविषयी दैनिकातून लेखन केले तसेच ऑनलाईन व्याख्याने राबवून विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले.

क्रीडा साहित्य घरोघरी

कोरोनापासून रक्षण होण्यासाठी जनसहभागातून होमिओपॅथिक गोळ्या व मास्क यांचे वाटप केले. लॉकडाऊनमधील मोकळ्या वेळेचा सदुपयोग व्हावा, ताणतणावार मात करता यावी यासह विद्यार्थ्यांचे मनोरंजन व्हावे, यांसाठी त्यांनी "ग्रंथालय आपल्या दारी", "क्रीडा साहित्य घरोघरी" हा उपक्रम राबविला. डोंगरी क्रीडा साहित्य केंद्राची स्थापना करुन त्यांनी बुद्धिबळ, कॅरम हे खेळ डोंगरी भागातील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करुन दिले. लॉकडाऊन काळात विद्यार्थ्यांना इनडोअर खेळांकडे वळवत क्रीडा स्पर्धांचा सरावही चालू ठेवला. डोंगरी ग्रंथालयाच्या माध्यमातून पुस्तके वाटत विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी वाढवली. ऑनलाईन क्रीडा मार्गदर्शन व्याख्यानमाला आयोजित करुन क्रीडा अधिकारी, राष्ट्रीय खेळाडू, योगतज्ज्ञ, समतोल आहार, व्यायाम, योग, खेळ इत्यादी विषयावर व्याख्याने आयोजित केली. शारीरिक शिक्षणाचे अध्यापन सुरू ठेवत घरबसल्या विद्यार्थ्यांचे क्रीडा ज्ञान त्यांनी वृद्धींगत केले. पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन स्पर्धा घेऊन शाळा बंद काळातही शासनाची वृक्ष लागवड मोहीम त्यांनी सुरूच ठेवली.

पर्यावरण प्रेम वाढवित त्यांनी विद्यार्थ्यांना वृक्षारोपणाकडे वळवले. आपला वाढदिवस रक्त तुटवडा काळात रक्तदान, वृक्षारोपण व शैक्षणिक साहित्य वाटप करत साजरा केला. समाजशीलता जपत अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा करत विद्यार्थ्यांपुढे आदर्श घालून दिला. कोरोनामुळे अडचणीत सापडलेल्या डोंगरी, जंगल भागातील दोनशे विद्यार्थ्यांना जनसहभागातून शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. त्यांच्या या शैक्षणिक, सामाजिक कार्याची दखल विविध संस्थानी घेत त्यांना कोरोना योद्धा पुरस्कारानेही सन्मानित केले आहे. कोरोना शाळा बंद काळात राबवलेल्या उपक्रमांबद्दल त्यांची सांगली आकाशवणीवर मुलाखतही प्रक्षेपित झाली आहे. या उपक्रमांसाठी व यशासाठी त्यांना सांगलीचे अधिव्याख्याक्ता डॉ.राजेंद्र भोई, गटशिक्षणाधिकारी प्रदीपकुमार कुडाळकर, केंद्रप्रमुख मधुवंती धर्माधिकारी, जिल्हा क्रीडा अधिकारी माणिक वाघमारे यासह आदींचे मार्गदर्शन लाभले.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.