ETV Bharat / state

भ्रष्टाचार प्रकरणी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या चौकशीचे आदेश - सांगली शहर बातमी

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील भष्ट्राचार प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश सहकार आयुक्तांनी कोल्हापूर विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था कार्यालयाला दिले आहेत.

सांगली जिल्हा बँक
सांगली जिल्हा बँक
author img

By

Published : Jan 30, 2021, 3:51 PM IST

Updated : Jan 30, 2021, 4:00 PM IST

सांगली - सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील भ्रष्टाचार प्रकरणाची चौकशीचे निर्देश सहकार आयुक्तांनी कोल्हापूर विभागीय सहनिबंधक यांना दिले आहेत, अशी माहिती तक्रारदार सुनील फराटे यांनी दिली आहे.

माहिती देताना तक्रारदार फराटे

भ्रष्टाचार प्रकरणी मध्यवर्ती बँकेच्या चौकशीचे आदेश

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकार बँकेमध्ये नोकर भरती, बोगस कर्ज वाटप, मालमत्ता खरेदीमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप स्वतंत्र भारत पक्षाचे नेते सुनील फराटे यांनी केली होता. याबाबत फराटे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. मात्र, त्याबाबत फारशी दखल घेतली गेली नाही. त्यामुळे फराटे यांनी नाबार्डकडे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या भ्रष्टाचाराबाबत तक्रार दिली होती. त्या तक्रारीची दखल घेऊन नाबार्डकडून सहकार आयुक्त व निबंधक, पुणे यांना याबाबत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पुणे सहकार आयुक्त व निबंधक कार्यालयाकडून कोल्हापुरातील विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था कार्यालयाला सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या विरोधात असणाऱ्या तक्रारीबाबत सखोल चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले. योग्य ती कार्यवाही करून केलेल्या कार्यवाहीबाबत संबंधितांना कळवावे, असे पत्र पाठवण्यात आल्याची माहिती, तक्रारदार सुनील फराटे यांनी दिली आहे.

चौकशी पत्र मिळाले नाही

दरम्यान, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या या चौकशीबाबत सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे व्यवस्थापक जयवंत कडू-पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी याबाबत कोणतेही पत्र मिळाले नाही आणि कोणत्याही प्रकारच्या चौकशीस आम्ही तयार आहोत, असे स्पष्ट करत अधिक बोलण्यास नकार दिला आहे.

बँकेवर राष्ट्रवादीचे प्राबल्य

तर जिल्हा मध्यवर्ती बँकेत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि भाजपचे संयुक्त संचालक मंडळ आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे कट्टर समर्थक दिलीप पाटील हे या बँकेचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे मध्यवर्ती बँकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राबल्य आहे. त्यामुळे बँकेच्या बाबतीत सखोल चौकशी आणि कार्यवाही होईल का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मात्र, या चौकशीच्या निर्देशामुळे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

हेही वाचा - वारणानगर नऊ कोटी चोरी प्रकरण : सांगलीत मुख्य संशयिताचा पाठलाग करून निर्घृण खून

Last Updated : Jan 30, 2021, 4:00 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.