ETV Bharat / state

रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे सांगलीत अर्भकाचा आईच्या पोटातच मृत्यू

या घटनेची पालिका प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून उपायुक्त स्मृती पाटील यांनी प्रसूतीगृहाची पाहणी करत, या प्रकरणी चौकशी सुरू केली आहे. या बाबतचा अहवाल तयार करून आयुक्तांकडे पाठवण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

author img

By

Published : Jun 29, 2019, 3:16 PM IST

सांगली

सांगली - हलगर्जीपणा आणि वेळेत रुग्णवाहिका उपलब्ध होऊ न शकल्याने सांगली महापालिकेच्या प्रसूतीगृहात एका महिलेच्या गर्भातच अर्भकाचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. पालिका उपायुक्त यांनी या सर्व प्रकरणाची चौकशी सुरू केली असून आयुक्तांकडे याबाबतचा अहवाल पाठवण्यात येणार आहे. उपमहापौरांनी नवी रुग्णवाहिका मिळेपर्यंत आपली गाडी रुग्णालयाला सुपूर्द केली आहे.

रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे सांगलीत अर्भकाचा आईच्या पोटातच मृत्यू

सांगली महापालिकेच्या सावित्रीबाई फुले प्रसूतीगृहात एका महिलेच्या पोटातच अर्भकाचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. सांगलीचे माहेर असणाऱ्या आशा सोमनाथ कोरडे प्रसूतीसाठी 26 जूनला महापालिकेच्या सावित्रीबाई फुले प्रसूतीगृहात दाखल झाल्या होत्या. त्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू होते. गुरुवारी वेदना वाढल्याची कल्पना नातेवाईकांनी संबंधित डॉक्टर, नर्स यांना दिली होती. यानंतर महिलेची पुन्हा तपासणी करून बाळ सुखरूप असल्याचे सांगण्यात आले, मात्र पुन्हा महिलेला त्रास होऊ लागल्याने नातेवाईकांनी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेतला. मात्र, याठिकाणी प्रसूतीग्रहाची असणारी रुग्णवाहिका नादुरुस्त असल्याचे कारण पुढे केले. त्यामुळे नातेवाइकांनी महिलेला रिक्षातून घेऊन शासकीय रुग्णालय गाठले. त्याठिकाणी तपासणी केली असता दोन तासापूर्वीच महिलेच्या गर्भातच अर्भकाचा मृत्यू झाल्याचे समोर आले.

रुग्णालय प्रशासनाचा हलगर्जीपणा, नादुरुस्त असलेली रुग्णवाहिका यामुळे महिलेला वेळेत उपचार मिळू शकले नाही. त्यामुळे गर्भातच मृत्यू झाल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेनंतर सांगली महापालिकेचे उपमहापौर आणि नगरसेवकांनी प्रसूतीगृहाची झाडाझडती घेत रुग्णालय प्रशासनाला धारेवर धरले. रुग्णवाहिका नादुरुस्त असल्याचे समोर आल्याने उपमहापौर धीरज सूर्यवंशी यांनी स्वतःचे वाहन रुग्णालयाकडे सुपूर्द केले आहे. जोपर्यंत प्रसूतीगृहाला रुग्णवाहिका मिळत नाही, तोपर्यंत महापालिकेची गाडी वापरणार नसल्याचे त्यांनी पालिका प्रशासनाला लेखी पत्रद्वारे कळवले आहे.

Intro:सरफराज सनदी - सांगली .

AVB

Fees send file name - MH_SNG_PRASUTI_ARBHAKA_MRTYU_29_JUNE_2019_VIS_1_7203751 - to - MH_SNG_PRASUTI_ARBHAKA_MRTYU_29_JUNE_2019_BYT_4_7203751

स्लग - हलगर्जीपणा पणामुळे अर्भकाचा आईच्या पोटातच मृत्यू,महापालिकेच्या प्रसूतीगृहातील धक्कादायक प्रकार..

अँकर - हलगर्जीपणा आणि वेळेत रुग्णवाहिका उपलब्ध होऊ न शकल्याने सांगली महापालिकेच्या प्रसूती गृहात एका महिलेच्या गर्भातचं अर्भकाचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.तर पालिका उपायुक्त यांनी या सर्व प्रकरणाची चौकशी सुरू केली,असून आयुक्तांकडे याबाबतचा अहवाल पाठवण्यात येणार आहे.तर उपमहापौरांनी नवी रुग्णवाहिका मिळे पर्यंत आपली गाडी रुग्णालयाच्या सुपूर्द केली आहे.Body:व्ही वो - सांगली महापालिकेच्या सावित्रीबाई फुले प्रसूतीगृहात एका महिलेच्या पोटातच अर्भकाचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.सांगलीचे माहेर असणाऱ्या आशा सोमनाथ कोरडे प्रसूतीसाठी 26 जून रोजी महापालिकेच्या सावित्रीबाई फुले प्रसूतिगृहात दाखल झाल्या होत्या. त्यानंतर तिच्या उपचार सुरु होते,गुरुवारी वेदना वाढल्या याची कल्पना नातेवाईकांनी संबंधित डॉक्टर,नर्स यांना दिल्या होत्या.यांनंतर महिलेच्या पुन्हा तपासणी करून बाळ सुखरूप असल्याचे सांगण्यात आले.मात्र पुन्हा माहिलेला त्रास होऊ लागल्याने, नातेवाईकांनी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेतला. तर पालिकेच्या रुग्णालयाने ही बाब लक्षात घेऊन शासकीय रुग्णालयात हलवण्याचा हालचाली सुरू केल्या,मात्र याठिकाणी प्रसूती ग्रहाची असणारी रुग्णवाहिका नादुरुस्त असल्याचे कारण पुढे केले.त्यामुळे नातेवाइकांनी महिलेला घेऊन रिक्षातून शासकीय रुग्णालय गाठले.आणि या ठिकाणी तपासणी केली असता दोन तासापूर्वीच पहिलीच्या गर्भातच अभ्रकाचा अर्भकाचा मृत्यू झाल्याचं समोर आली.रुग्णालय प्रशासनाचा हलगर्जीपणा,नादुरुस्त असलेली रुग्णवाहिका त्यामुळे महिला वेळेत उपचार न मिळू शकले नाही. त्यामुळे गर्भातच मृत्यू झाल्याचा प्रकार घडला आहे.या घटनेनंतर सांगली महापालिकेचे उपमहापौर आणि नगरसेवकांनी प्रसूतीगृहाची झाडाझडती घेत,धारेवर धरलं,रुग्णवाहिका नादुरुस्त असल्याचे समोर आल्याने उपमहापौर
धीरज सूर्यवंशी यांनी स्वतःचे वाहन याठिकाणी रुग्णालयाकडे सुपूर्द केले आहे.जोपर्यंत प्रसूतीगृहाला रुग्णवाहिका मिळत नाही,तोपर्यंत महापालिकेची गाडी वापरणार नसल्याचे पालिका प्रशासनाला लेखी पत्रद्वारे कळविले आहे.या घटनेची पालिका प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून उपायुक्त स्मृती पाटील यांनी प्रसूतीगृहाची पाहणी करत,या प्रकरणी चौकशी सुरू केली असून या बाबतचा अहवाल तयार करून आयुक्तांच्याकडे पाठवण्यात येईल असं स्पष्ट केले आहे.

बाईट - स्मृती पाटील - उपाआयुक्त - महापालिका , सांगली.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.