ETV Bharat / state

अवैध वाळू वाहतूक रोखणाऱ्या तलाठ्याचे अपहरण करण्याचा प्रयत्न, चालत्या गाडीतून मारली उडी - news about illegal sand transportation

सांगलीतील मिरज-कोल्हापूर मार्गावर पहाटेच्या सुमारास अवैध वाळू तस्करी करणाऱ्या वाहनावर मिरज तहसील प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली. या वेळी एका ट्रक चालकाने तलाठ्याचे अपहरण करण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला.

illegal-sand-transport-truck-seized-by-tahsil-department
अवैध वाळू वाहतूक रोखण्यास गेलेल्या तलाठ्याचे अपहरण, चालत्या गाडीतुन तलाठ्याने मारली उडी
author img

By

Published : Jan 30, 2020, 4:29 PM IST

सांगली - अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी गेलेल्या तलाठ्याचे अपहरण करण्याचा प्रयत्न वाळू माफियांकडून झाला. यानंतर सिनेस्टाईल पाठलाग करत महसूल प्रशासनाने वाळू माफिायांचे ४ ट्रक जप्त केले. हा प्रकार मिरज शहरात घडला.

अवैध वाळू वाहतूक रोखण्यास गेलेल्या तलाठ्याचे अपहरण करण्याचा प्रयत्न, चालत्या गाडीतुन तलाठ्याने मारली उडी

सांगलीतील मिरज-कोल्हापूर मार्गावर पहाटेच्या सुमारास अवैध वाळू तस्करी करणाऱ्या वाहनावर मिरज तहसील प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली. मिरजेचे प्रांताधिकारी समीर शिंगटे आणि तहसीलदार रणजित देसाई यांनी संयुक्त कारवाई करत वाळू तस्कराच्या मुसक्या आवळल्या. या कारवाईत अवैध वाळूचे 3 ट्रक आणि 1 आयशर ट्रक पकडण्यात आले. हे ट्रक जप्त करून मिरज तहसील कार्यालयात घेऊन जाताना एका वाळू ट्रक चालकाने गाडी वळवण्याच्या बहाण्याने गाडी सुसाट पळवली. या गाडीत तलाठी प्रवीण जाधव होते. मात्र, वाळू माफियाने जाधव यांच्यासह ट्रक कोल्हापूर शिरोळच्या दिशेने सुसाट नेला. यानंतर तहसीलदार समीर शिंगटे यांनी वाळू ट्रकचा सिनेस्टाईल चित्तथरारक पाठलाग सुरू केला. गाडीत असणाऱ्या तलाठी जाधव यांनी गाडीचे टायर फुटल्यानंतर ट्रकमधून उडी मारली. यात तलाठी जाधव जखमी झाले. तहसीलदार देसाई यांनी पाठलाग करत ट्रक ताब्यात घेत तलाठी जाधव यांना सुरक्षित ठिकाणी हलवले. या कारवाईत अवैध वाळूचे 3 ट्रक आणि 1 आयशर ट्रक पकडण्यात आले असून तीन्ही ट्रक विना नंबरचे असल्याचे समोर आले. याप्रकरणी अवैध वाळू वाहतूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Intro:

File name - mh_sng_02_valu_mafiya_vis_01_7203751. - To -
mh_sng_02_valu_mafiya_byt_02_7203751

स्लग - अवैध वाळू वाहतूक रोखण्यास गेलेल्या तलाठ्याचे अपहरण,चालत्या गाडीतुन तलाठ्याने मारली उडी...

अँकर - अवैध वाळू वाहतूक रोखण्यास गेलेल्या तलाठ्याचे अपहरण करण्याचा प्रकार वाळू माफियांकडून झाला आहे.
यानंतर सिनेस्टाईल पाठलाग करत महसूल प्रशासनाने 4 ट्रक जप्त केले आहेत. मिरजमध्ये हा प्रकार घडला आहे.

स्लग - सांगलीच्या मिरज-कोल्हापूर मार्गावर पहाटेच्या सुमारास अवैधपणे वाळू तस्करी करणाऱ्या वाहनावर मिरज तहसील प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली आहे.मिरजेचे प्रांताधिकारी समीर शिंगटे आणि तहसीलदार रणजित देसाई यांनी संयुक्त कारवाई करत वाळू तस्कराच्या मुसक्या आवळल्या आहेत. या कारवाईत अवैध वाळूचे 3 ट्रक आणि 1 आयशर ट्रक पकडले.आणि ते जप्त करून मिरज तहसील कार्यालयात घेऊन जाताना एका वाळू ट्रक चालकाने गाडी वळवण्याचे बहाण्याने सुसाट गाडी पळवली,यावेळी या गाडीत तलाठी प्रवीण जाधव होते,मात्र वाळू माफियाने जाधव यांच्यासह ट्रक कोल्हापूर शिरोळच्या दिशेने सुसाट नेला.यानंतर तहसीलदार समीर शिंगटे यांनी वाळु ट्रकचा सिनेस्टाईल चित्तथरारक पाठलाग सुरू केला.गाडीत असणाऱ्या तलाठी जाधव यांनी गाडीचे टायर फुटल्यानंतर ट्रक मधून उडी मारली.यात तलाठी जखमी झाले.तर तहसीलदार देसाई यांनी पाठलाग करत ट्रक ताब्यात घेत तलाठी जाधव यांनी सुरक्षित ठिकाणी हलवले.
तर या कारवाईत अवैध वाळूचे 3 ट्रक आणि 1 आयशर ट्रक पकडला, पकडले असून 3 ही ट्रक वीना नंबरचे असल्याचे समोर आले.याप्रकरणी अवैध वाळू वाहतूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बाईट-: समीर शिंगटे, प्रांताधिकारी , मिरज.

Body:.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.