सांगली - आनंद महिंद्रा साहेब आम्ही आपले आभारी आहोत, पण "ही"आमची लक्ष्मी आहे. त्यामुळे ही गाडी तुम्हाला द्यावीशी वाटत नाही. हवी तर तुम्हाला दुसरी बनवून देऊ पण या गाडीची अदला-बदल करता येणार नाही. तसेच, शिवाय पेट्रोल, डिझेलचे भाव पाहता तुमच्याकडून देण्यात येणाऱ्या बोलेरो गाडीत बसायची आपली ऐपत नाही अशी प्रतिक्रिया दत्तात्रय लोहार दाम्पत्यांनी दिली आहे. भंगार आणि दुचाकी साहित्याचा जुगाड करत एका अवलियाने चक्क चार चाकी गाडीची निर्मिती (Four Wheeler made from scratch) केली आहे. अगदी ऐटीत बसून जाण्यासारखी ही भन्नाट गाडी रस्त्यावर सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. — anand mahindra (@anandmahindra) December 21, 2021 दुचाकीचा इंजन आणि जीप गाडीचा ढाचा, असा अफलातून प्रयोग करून ही चारचाकी गाडी कडेगावच्या देवराष्ट्र येथील दत्तात्रय लोहार या अवलियाने बनवली आहे. दरम्यान, यागाडीची सर्वात अगोदर ईटीव्ही भारतने बातमी प्रसिद्ध केली होती.
देसी जुगाड गाडीची चालतीभंगारातल्या साहित्याचा वापर करत बनवलेली चारचाकी गाडी सध्या चांगलीच चर्चेत आहे. दत्तात्रय लोहार यांनी आपल्या कल्पक बुद्धीने निर्माण केलेल्या या गाडीला थेट आनंद महिंद्रा यांनी देखील मागणी घातली. (Best Out Of Waste In Sangli) त्या बदल्यात त्यांना नवी कोरी बोलेरो गाडी देण्याचे जाहीर केले आहे. पण लोहार दाम्पत्य आनंद महिंद्रा यांच्या ऑफरबाबत द्विधा मनस्थितीत असून जुगाड गाडी ऐवजी दुसरी गाडी तयार करून देऊ अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे.
मुलाची इच्छा,कल्पक बुद्धी आणि जुगाड गाडी
सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील देवराष्ट्रे येथील दत्तात्रय लोहार हे फब्रिकेशन व्यवसाय करतात. त्यांनी आपल्या मुलाच्या इच्छ पुर्ण करण्यासाठी आपल्या कल्पक बुद्धीने अत्यंत लहान चार चाकी गाडी बनवली आहे. दुचाकीचे इंजिन आणि भंगारातील साहित्य या सर्वांचा वापर करत एक टुमदार जुगाड गाडी तयार केली आहे. पेट्रोलवर धावणारी आणि किकवर मारून सुरू होणारी ही गाडी असून या गाडीचा लुक हा जीप प्रमाणे आहे. तशी 45 किलोमीटर आणि प्रति लिटर 45 किलोमीटर मायलेज आणि चौघे बसण्याची क्षमता व लेफ्ट हॅन्ड ड्रायव्हिंग या गाडीचे वैशिष्ट्य आहेत. अशी ही गाडी रस्त्यावर धावू लागली आहे.
ईटीव्हीकडून सर्वात आधी वृत्त प्रसारित
या गाडीची बातमी सर्वात आधी "ईटिव्ही भारत"ने प्रसिद्ध केली होती.आणि सोशल मीडियावर या जुगाड गाडीची चलती सुरू झाली. सगळीकडेच लोहार यांच्या या जुगाड जीप गाडीची एकच चर्चा सुरू झाले. याबाबत थेट महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी देखील लोहार यांच्या जुगाड गाडीचं कौतूक केले आहेय तर, त्यांनी लोहार यांना या गाडीच्या बदल्यात नवी कोरी बोलेरो गाडी देण्याची ऑफर दिली आहे. त्यामुळे लोहार यांची ही गाडी आणखी चर्चेत आली.
रातोरात दत्तात्रय लाहोर यांची जुगाड गाडी आणि लोहार फेमस झाले आहेत. त्यांना राज्यातच नव्हे तर देशाच्या काना-कोपऱ्यातून शुभेच्छा येत आहेत. यातच आनंदा महिंद्र यांनी जाहीर केलेल्या ऑफरमुळे लोहार कुटुंब भारावून गेले आहे.
संसाराला चिमटा काढून बनवली गाडी
दत्तात्रेय लोहार यांचे कुटुंब हे सहा जणांचे आहे. एक मुलगा दोन मुली पत्नी आणि आई असं कुटुंब आहे. त्यांची एक एकर शेती आहे. मात्र वाटणीच्या वादातून ती अडकून पडल्याने शेतातून काही उत्पन्न नाही. वेल्डिंग आणि धार लावण्याच्या व्यवसायातून त्यांना थोडेफार पैसे मिळतात. याच पैशातून थोडीफार बचत करून दोन वर्षांच्या अथक प्रयत्नातून दत्तात्रय लोहार यांनी संसाराचा गाडा चालवला. दरम्यान, अनेक अडचणीतून ही जुगाड गाडी बनवली. मुलाची इच्छा आणि आपल्याही दारात चार चाकी गाडी असावी. पण घेण्याची ऐपत नसल्याने स्वतःच् चारचाकी गाडी बनविण्याची असलेली जिद्द यामुळे लोहार यांनी अखेर 2 वर्षानंतर 60 ते 70 हजार रुपये खर्च करून बनवलेली जुगाड गाडी त्यांच्या दारात आता उभी आहे. त्यामुळे ही जुगाड गाडी ते "लक्ष्मी" मानतात, या गाडीतून दोन महिन्यांपासून ते पंढरपूर, सांगोला, सातारा या ठिकाणी प्रवासी करून आले आहेत, शिवाय घरच्या आणि व्यवसायाच्या कामासाठी आता रोज ती गाडी वापरत आहेत.
हवी तर दुसरी गाडी बनवून देऊ
आनंद महिंद्रा यांच्या ऑफरनंतर लोहार कुटुंब द्विधा मनस्थितीत आहे. अत्यंत कष्टाने चिकाटीने बनवलेली गाडी त्यांना द्यावीशी वाटत नाही. कारण ही गाडी त्यांच्यासाठी लक्ष्मी आहे. गाडीनंतर त्यांच्या जीवनात काही चांगल्या गोष्टी घडल्या आहेत. त्यामुळे घरची लक्ष्मी द्यायची कशी देणार? हा त्यांच्यासमोर प्रश्न उभा झाला आहे. यातून लोहार दांपत्य यांनी आनंद महिंद्रा यांना या गाडी ऐवजी दुसरी गाडी तयार करून देऊ, पण गाडीची अदला-बदल नको, अशी इच्छा व्यक्त केला केली आहे. महेंद्रा साहेबांना द्यायचीच असेल तर खुशीने गाडी द्यावी, पण ती गाडी घेऊन तर काय करायचे? कारण बसायची आणि पेट्रोल घालायची आपली ऐपत नाही, कारण आपल्या गाडीचे मायलेज 45 आणि ते देणाऱ्या गाडीची 10 ते 12 त्यामुळे कसं होणार? असे आर्थिक गणित घालताना लोहार दांम्पत्याने आपली जुगाड गाडी आनंद महेंद्रा यांना देण्यास एकप्रकारे नकार दिला आहे.
नॅनो पेक्षा छोटी
दिसायला अगदी एखाद्या विंटेज (ओल्ड मॉडेल) प्रमाणे ही गाडी दिसते. नॅनो गाडी पेक्षा ही लोहार यांनी बनवलेली गाडी अगदी छोटी आहे. स्वतःच्या कल्पक डोक्याचा वापर करत दत्तात्रय लोहार यांनी ही चार व्यक्ती बसू शकतील अशी, गाडी बनवली आहे.विशेष म्हणजे या गाडील स्टार्टर नसून पायाने किक मारून चालू होते. याचे स्टेरींग हे डाव्या बाजूला आहे. पेट्रोलवर ही गाडी धावत असून 1 लिटर पेट्रोल मध्ये 40 ते 45 किलोमीटर इतके मायलेज असून ताशी 40 किलोमीटर वेगाने ही गाडी धावते.तर ही गाडी बनवण्यासाठी लोहार यांना 50 ते 60 हजार इतका खर्च आला आहे.
जिद्द असेल तर काहीही अशक्य नाही
आता ही गाडी दत्तात्रय लोहार घेऊन आपल्या कुटुंबासमवेत फिरत आहेत. आणि रस्त्यावरून जाताना ही गाडी पाहून सगळेजण आश्चर्य तर व्यक्त करतात. शिवाय दत्तात्रेय लोहार यांच्या या कल्पक बुद्धीलाही सलाम करतात. लोहार यांचा फारसं शिक्षण झालं नाही किंवा कोणतेही पदवी त्यांनी घेतली नाही.पण आपल्या मुलाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी निर्माण केलेली ही चार चाकी जुगाड गाडी सर्वांचं लक्ष वेधून घेतेच. शिवाय इच्छाशक्ती आणि जिद्द असेल तर काहीही अशक्य नाही,हे दाखवून देते.
हेही वाचा- नितीन राऊतांना काँग्रेस हायकमांडकडून 'दे धक्का'; अनुसूचित जाती विभागाच्या अध्यक्षपदावरून हटवलं