ETV Bharat / state

कोरोनाचा पॉझिटिव्हिटी दर वाढल्यास निर्बंध वाढणार - जिल्हाधिकारी

सांगली जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर हा कमी झाला होता. मात्र, हा दर आता 9.30 टक्क्यांवर पोहोचला असून दहा टक्क्यांवर हा दर पोहोचण्याची शक्यता आहे. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी नियम पाळा अन्यथा चौथा स्तर लागू, असा इशारा सांगलीकरांना दिला आहे.

सांगली
सांगली
author img

By

Published : Jun 25, 2021, 5:25 AM IST

Updated : Jun 25, 2021, 6:29 AM IST

सांगली - जिल्ह्याचा कोरोनाचा वाढता पॉझिटिव्हिटी दर पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कडक निर्बंधाचा इशारा दिला आहे. त्यानंतर सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सांगलीकरांना कोरोना नियमांचे पालन करण्याच्या सूचना देत पॉझिटिव्हिटी दर 10 टक्क्यांच्या पुढे गेल्यास चौथ्या स्तराचे निर्बंध लागू करण्याचा इशारा दिला आहे.

सांगलीतील परिस्थिती

कमी झालेला पॉझिटिव्हिटी दर वाढू लागला

सांगली जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव काही दिवसांपूर्वी कमी झाला होता. त्यामुळे जिल्ह्यातील निर्बंध शिथिल करण्यात आले होते. राज्य शासनाच्या निकषानुसार सांगली जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर हा दहा टक्क्यांच्या आत आल्याने निर्बंध उठवण्यात आले आहेत. त्यामुळे अत्यावश्यक सेवेसह इतर दुकानांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सांगली जिल्ह्याची कोरोनाग्रस्तांचा आकडा पुन्हा वाढू लागला आहे. त्यामुळे जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर हा 9.30 टक्क्यांवर पोहोचला आहे.

...अन्यथा चौथा स्तर लागू होणार

काही दिवसांमध्ये हा दर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याचा कोरोना आढावा घेतला. ज्या जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर वाढेल त्या जिल्ह्यात कडक निर्बंध लागू करण्याचे आदेश त्यांनी स्थानिक प्रशासानाला दिले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या सुचनेनंतर सांगलीचे जिल्हा अधिकारी अभिजित चौधरी यांनी सांगलीकर जनतेला कोरोना नियमांचे कडक पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करावे, गर्दी टाळावे, पॉझिटिव्हिटी दर हा दहा टक्क्यांच्या पुढे गेला, तर चौथ्या स्तरात सांगली जिल्ह्याचा समावेश होऊन निर्बंध आणखी कडक करण्यात येतील, असा इशारा जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी दिला आहे.

हेही वाचा - ओबीसी नेते काका-पुतण्याच्या ताटाखालील मांजर, तर मंत्री झालेत माकड - गोपीचंद पडळकर

Last Updated : Jun 25, 2021, 6:29 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.