ETV Bharat / state

'राज्याने 'या' निर्देशांचे पालन केल्यास सांगली-कोल्हापूरात महापूर येणारच नाही'

कितीही पाऊस झाला तरी महापूर येणारच नाही, अशा काही उपाययोजना राज्य शासनाच्या पाटबंधारे विभागातील निवृत्त अभियंता विजयकुमार दिवाण यांनी मांडल्या आहेत. या उपाययोजनाची जर योग्य अंमलबजावणी केली तर महापुराची समस्या दरवर्षी येणार नाही, असा ठाम विश्वास दिवाण यांना व्यक्त केला आहे.

sangli kolhapur flood
सांगली-कोल्हापूरमध्ये महापूर
author img

By

Published : Jul 3, 2020, 7:40 PM IST

सांगली - कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात पूर टाळायचा असेल तर केंद्रीय जल आयोगाचे निर्देश पाळणे गरजेचे आहे. नाहीतर पुन्हा महापुराच्या संकटाचा सामना करावा लागणार असल्याचे मत निवृत्त अभियंता विजयकुमार दिवाण व्यक्त केले आहे. संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर दिवाण यांनी राज्य सरकारला काही सूचना देखील केल्या आहेत. राज्य शासनाच्या पाटबंधारे विभागातील अभियंता म्हणून काम केलेले सांगलीतील निवृत्त अभियंता विजयकुमार दिवाण यांनी संभाव्य महापुरावरून राज्य सरकारला सूचना केल्या आहेत.

निवृत्त अभियंता विजयकुमार यांची प्रतिक्रिया...

हेही वाचा - मुंबईत जोरदार पाऊस; येत्या ४८ तासात मुसळधार पावसाची शक्यता

दिवाण यांनी अभियंता म्हणून कोयना धरणापासून ते अलमट्टी धरणापर्यंत अनेकवेळा पुराच्या कारणांबाबत अभ्यास केला आहे. गतवर्षी ऑगस्ट महिन्यात सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व नद्यांना महापूर आला होता. सध्या पुन्हा महापुराची धास्ती निर्माण झाली आहे. यावर्षीही महापूर आला तर कृष्णेसह सर्व नद्यांची पाणी पातळी किती राहील. महापूर आलाच तर शहरात आणि नदीकाठावरील गावांत पाणी किती दिवस थांबून राहील. संभाव्य नुकसान किती असेल? वसाहती स्थलांतरित कराव्या लागतील का? असे अनेक प्रश्न आणि शंका सर्वसामान्य नागरिक, शेतकरी आणि व्यावसायिकांना भेडसावत आहेत.

कितीही पाऊस झाला तरी महापूर येणारच नाही, अशा काही उपाययोजना राज्य शासनाच्या पाटबंधारे विभागातील निवृत्त अभियंता विजयकुमार दिवाण यांनी मांडल्या आहेत. या उपाययोजनाची जर योग्य अंमलबजावणी केली तर महापुराची समस्या दरवर्षी येणार नाही, असा ठाम विश्वास दिवाण यांना व्यक्त केला आहे.

..तर महापूर येणार नाही

दिवाण यांच्या मते केंद्रीय जल आयोगाच्या निर्देशानुसार धरणातील पाणीसाठा नियंत्रित ठेवणे, अलमट्टी, कोयना, वारणा, राधानगरी, धोम, कण्हेरसह सर्व धरणातील पाणी विसर्गबाबत मिनिट टू मिनिट समन्वय ठेवणे, नदी प्रवाहात अडथळे आणणाऱ्या अतिक्रमणांबाबत निर्णय घेणे, आता जुलैपासून धरणातील पाणी काही प्रमाणात दुष्काळग्रस्त भागात सोडणे, असे काही उपाय केल्यास पूरनियंत्रण शक्य आहे. तसेच केंद्रीय जल आयोगाच्या निर्देशाप्रमाणे काम केल्यास पूर येऊ शकत नाही, अशा सूचना दिवाण यांनी मांडल्या आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.