ETV Bharat / state

sangli crime मुलगा होत नसल्याने पतीकडून पत्नीचा गळा दाबून खुनाचा प्रयत्न, मृत समजून डोंगरावर दिले फेकून! - sangli crime

मुलगा होत नसल्याने पत्नीचा गळा दाबून खून करण्याचा प्रयत्न husband tried to kill his wife केल्याचा धक्कादायक प्रकार सांगलीत घडला आहे. एवढच नव्हे तर बेशुध्द अवस्थेतच असणाऱ्या पत्नीला मृत समजून थेट डोंगरावर फेकून दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पीडित पत्नीने पतीसह दोघांच्या विरोधात आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे.

attempted murder
खुनाचा प्रयत्न
author img

By

Published : Sep 1, 2022, 11:06 PM IST

सांगली आटपाडी तालुक्यातल्या काळेवाडी या ठिकाणी मुलगा होत नसल्याने पत्नीचा गळा दाबून खून करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार सांगलीत घडला आहे. गर्भवती महिलेचा पतीकडूनच गळा दाबून खून करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने एकच खळबळ माजली आहे. एवढच नव्हे तर बेशुध्द अवस्थेतच असणाऱ्या पत्नीला मृत समजून थेट डोंगरावर फेकून दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पीडित पत्नीने पतीसह दोघांच्या विरोधात आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे.

घटना अशी गर्भवती असणाऱ्या पत्नीला तुझ्या पोटात मुलगा आहे का, मुलगी ? याची तपासणी करायचे असे सांगत, तिला मुंबई मधून सातारा येथे आणले त्यानंतर तिला संपत मामा नामक व्यक्तिच्या गाडीतून आटपाडीच्या दिशेने नेले. यादरम्यान जात असताना पत्नी प्रेमलता हीचा पतीने दोरीने गळा आवळला, ज्यामुळे प्रेमलता ही बेशुद्ध झाली, पण आपली पत्नी मृत झाल्याचे समजून त्याने पत्नीला बेशुद्ध अवस्थेत आटपाडी तालुक्यातल्या कोळीवाडी येथील चिंचघाट डोंगरात फेकून दिले.मात्र काही वेळानंतर प्रेमलता हि शुद्धीत आली, त्यानंतर तिने गावात पोहचून आपल्या बाबतीत घडलेली गोष्ट सांगितली, त्यानंतर ग्रामस्थांनी आटपाडी पोलिसांशी संपर्क करत केला,त्यानंतर पोलिसांनी तातडीने धाव घेत प्रेमलता हिला सांगलीचे शासकीय रुग्णालयामध्ये दाखल केले असून या प्रकरणी पदीमनी जिना आणि संपत या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा Aurangabad Crime: घरगुती वादातून महिलेने पोलीस आयुक्तालयात घेतलं पेटवून

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.