सांगली : मुली झाल्याच्या रागातून एका पतीने आपल्या पत्नीचा खून केल्याची धक्कादायक घटना इस्लामपूरच्या कापूसखेड येथे ( Islampur Kapuskhed Murder Case ) घडली आहे. विहिरीत ढकलून देऊन खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. राजनंदिनी सरनोबत, असे विवाहित महिलेचे नाव असून, या प्रकरणी इस्लामपूर ( Accuse Kaustubh Sarnobat Arrested ) पोलीस ठाण्यात पती कौस्तुभ सरनोबत विरोधात खुनाचा गुन्हा दाखल ( Murderer Husband Arrested by Police ) झाला आहे.
![Islampur Police Station Sangli](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-sng-01-wife-murder-img-00-mh10047_19092022105154_1909f_1663564914_479.jpg)
पती कौस्तुभ सरनोबत याने पत्नीला ओढत नेऊन विहिरीत ढकलले : कोल्हापूर जिल्ह्यातल्या बावडा येथील राजनंदिनी यांचा विवाह आठ वर्षांपूर्वी इस्लामपूर येथील कौस्तुभ सरनोबत यांच्यासोबत झाला होता. त्यांना दोन मुली आहेत. मात्र, दोन मुली झाल्या, मुलगा झाला नाही, याचा राग पती कौस्तुभ सरनोबत याच्या मनामध्ये होता. या रागातून 18 सप्टेंबर रोजी सकाळी सरनोबत दाम्पत्य मॉर्निंगवॉकसाठी सकाळी घरातून बाहेर पडले. त्यानंतर इस्लामपूरच्या कापूसखेड रस्त्याकडे गेले असता, पती कौस्तुभ सरनोबत याने पत्नी राजनंदिनी हिला ओढत नेऊन कापूसखेड हद्दीतील एका विहिरीमध्ये फेकून दिले. ज्यामध्ये पोहता येत नसल्याने राजनंदिनी सरनोबत ( वय 29 ) हिचा बुडून मृत्यू झाला आहे.
पती कौस्तुभ याने सुरवातीला पत्नीचा अपघाती मृत्यूचा केला होता बनाव : दरम्यान, पती कौस्तुभ याने सुरवातीला पत्नीचा अपघाती मृत्यू झाल्याचा बनाव केला होता. मॉर्निगवॉकसाठी गेले असता, रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या विहिरीत जाऊन पडल्याने पत्नी राजनंदिनी हिचा मृत्यू झाल्याची फिर्याद इस्लामपूर पोलीस ठाण्यामध्ये दिली होती. मात्र, राजनंदिनी हीच्या माहेरच्या नातेवाईकांनी याबाबत आक्षेप घेत इस्लामपूर पोलीस ठाण्यामध्ये ठिय्या मारत, या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती. चौकशीमध्ये पती कौस्तुभ सरनोबत यानेच पत्नी राजनंदिनीचा विहिरीत ढकलून खून केल्याचा उघडकीस आले असून, कौस्तुभ सरनोबत याच्या विरोधात पत्नीचा खुनाचा गुन्हा दाखल करीत त्याला अटक केली आहे.