सांगली - प्रसंगी कर्ज काढले, जमिनीही विकल्या पण आता संभाळ करणे एवढंच काय एक वेळेच्या चाऱ्याचा प्रश्न देखील गंभीर बनला आहे. ही भीषण परिस्थिती आहे. विट्यातीळ एका गोशाळेची. (Vitthal-Rukmini Goshala) गेल्या काही वर्षांपासून 30 हुन अधिक गाईंचा सांभाळ करणारे आप्पासाहेब जाधव यांच्या बाबतीत सुरू आहे.
कत्तलखान्याकडे जाणारी जनावरे गोशाळेत
विट्याच्या आंबेगाव येथील आप्पासाहेब जाधव यांचे गाईंच्यावर विशेष प्रेम आहे. गोवंश हत्या विरोधात त्यांचे काम माणुसकीला साजेसे आहे. कारण कत्तलखान्याकडे जाणाऱ्या अनेक गाई, बैल, अशी भाकड जनवारे आप्पासाहेब जाधव यांनी पाळली आहेत. सुरवातीला एक-दोन गाई होत्या. (Vitthal-Rukmini Goshala In Sangali District) आता त्यांच्याजवळ 30 पेक्षा अधिक जनावर आहेत. जी आधी भाकड होती. मात्र, आता चांगल्या स्थितीत आहेत.
कुटुंबातील सदस्यांप्रमाणे गाईंचा सांभाळ
विठ्ठल-रुक्मिणी नावाने जाधव यांची गोशाळा सुरू आहे. 6 वर्षापूर्वी आप्पासाहेब जाधव यांनी वाटले नव्हेत. आपली गोशाळा होईल. पण हळूहळू जाधव यांची गोशाळेचा पसारा वाढला. हे सर्व होताना. जाधव यांना गोशाळा चालवताना अनंत अडचणी आल्या. पण त्यांनी यावर वेळोवेळी मात केली. (Vitthal-Rukmini Goshala In Ambegaon) गोशाळा चालवताना जाधव यांचे सर्व कुटुंब देखील हातभार लावते. कुटुंबातील सदस्यांप्रमाणे प्रत्येक जनावरांचा सांभाळ केला जातो.
मदत बंद,चाऱ्यासाठी जनावरांचा हंबरडा
आज जाधव यांची गोशाळा संकटात सापडली आहे. अर्थिक अडचणीमुळे जाधव यांना गाईंना चारा उपलब्ध करणे कठीण झाल्याने गाई हंबरडा फोडत आहेत. दररोज जाधव यांना अडीच हजार इतका खर्च 32 जनावरांच्या पालन-पोषणसाठी येतो. कोरोना संकटानंतर जाधव यांना चारा, देणगी यामध्ये अडसर येत आहे. पण कसा-बसा जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न सुटत होता. मात्र, काही माहिन्यांपासून ही अडचण तीव्र झाली आहे. परिणामी गोशाळेतील जनावरांचे हाल सुरू झाले आहेत. जाधव हे आपल्या परीने सर्व प्रयत्न करत आहेत. मात्र, आता त्यांनी अधिक कठीण बनले आहे.
एक वेळच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर
याबाबत आप्पासाहेब जाधव म्हणाले, 6 वर्षांपूर्वी आपण कत्तलखान्याकडे आणि भटक्या गाईंचा सांभाळ सुरू केला. आता त्यांची संख्या ही 32 झाली आहे. गोशाळा जरी असली तरी त्याला कोणत्याही प्रकारची जमीन विशेष मदत नाही. आपण आपल्या व्यवसाय आणि समाजातुन मदत गोळा करून गाईंचे पालन-पोषन सुरू होते. पेंड, चारा अशा प्रकारचे खाद्य मिळत होते. मात्र, कोरोना काळानंतर मदत मिळण्यात अडचण येऊ लागली. आपला वधू-वर सूचक मंडळाचे काम ही जवळपास बंद झाले आहे. त्यामुळे आता जनावरांच्या एक वेळच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला असून जनावरांच्यावर उपास मारीची वेळ आली आहे.
मदतीचा हात देण्याची हाक
जाधव यांनी देव मानून आता पर्यंत गाईंचे संगोपन केले आहे,त्यांच्या घरच्या लोकांकडूनही कुटुंबातील सदस्यांप्रमाणे जनावरांचा सांभाळ केला जात आहे. अनंत अडचणीवर मात करत जाधव यांनी चालवलेली गोशाळा मात्र आज भुकेने हंबरडा फोडत असून समाजाने मदतीचा हात द्यावा अशी विनंती जाधव करत आहेत.
हेही वाचा - पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांना 'स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार'