सांगली - रुग्णालयातील बायोमेडिकल कचरा मनपाच्या घंटागाडीत टाकल्याबद्दल सांगली शहरातील दुदनकर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलला महापालिकेने 1 लाखाचा दंड केला आहे. मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली.
शहरातील शिंदे मळा येथील दुदनकर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलने आपल्या रुग्णालयातील बायोमेडिकल कचरा हा महापालिकेच्या घंटागाडीत टाकल्याने, घनकचरा व्यवस्थापन कायद्याचा भंग झाला. याची माहिती मिळताच आरोग्यधिकारी डॉ रवींद्र ताटे आणि स्वच्छता निरीक्षक अतुल आठवले यांनी याबाबत पडताळणी केली. ज्यामध्ये बायोमेडिकल कचरा दुदनकर हॉस्पिटलचाच असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर याबाबत आयुक्त नितीन कापडणीस यांच्या सूचनेनुसार दुदनकर हॉस्पिटलला 1 लाखाचा दंड करण्यात आला आहे. या दंडाची वसुली स्वच्छता निरीक्षक अतुल आठवले यांनी केली.
हॉस्पिटलचा कचरा उघड्यावर टाकल्यास कारवाई
महापालिका क्षेत्रातील हॉस्पिटल प्रशासनाने आपल्या हॉस्पिटलमधील बायोमेडिकल कचरा हा उघड्यावर किंवा महापालिकेच्या कचरा कंटेनरमध्ये अथवा घंटागाडीमध्ये न टाकता यासाठी नियुक्त सुर्या एजन्सीकडे जमा करायचा आहे. याचे उल्लंघन झाल्यास त्या रुग्णालयावर दंडात्मक कारवाई बरोबरच कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिला आहे.
होही वाचा - पुण्यात रुग्णाचा मृत्यू झाल्याने नातलगांनी केली डॉक्टरांना मारहाण, रुग्णालयाची तोडफोड