सांगली- वाळवा तालुक्यातील गोटखिंडी गावात गेल्या चाळीस वर्षांपासून हिंदू मुस्लीम समाजबांधव एकत्र येऊन मशिदीमध्ये गणपती बसवून गणेशोत्सव साजरा करतात. 1981साली न्यू गणेश मंडळाने पहिल्यांदा मशिदीच्या बाहेर गणपती बसवन्याची परंपरा सुरू केली होती. विशेष म्हणजे या मशिदीमध्ये मोहरम आणि गणेशोत्सव हे एकाचवेळी साजरे केले जातात. यामाध्यमातून गोटखिंडीच्या ग्रामस्थांनी आपल्या कृतीतून धार्मिक आणि सामाजिक सलोखा जपत खऱ्या अर्थाने एकतेचा संदेश दिला आहे.
या मशिदीमध्ये गणेशमूर्ती बसवण्याची सुरुवात 1981 मध्ये झाली. आधी मशिदीच्या बाहेर गणपती बसवला जात होता. मात्र 1981 सालच्या गणेशोत्वाच्या दरम्यान जोरदार पाऊस झाला. मूर्तीवर पाणी पडू लागल्याने गणपतीची मूर्ती कुठे ठेवायाची हा प्रश्न निर्माण झाला होता. त्यावेळी गावातील मुस्लीम बांधवांनी पुढाकार घेऊन गणेपतीची मूर्ती मशिदीमध्ये ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर आजतागायत गोटखिंडी गावात गणपती उत्सव मशिदीमध्येच साजरा केला जातो.
गणेशोत्सवा दरम्यान गणेश चतुर्थी व मोहरम पंजा हे सण आले तर एका मशिदीतच गणपती आणि मोहरम सन एकत्र साजरा केला जातो. अशा प्रकारे मशिदीमध्ये हिंदू मुस्लिमांचे सण साजरा करणारे गोटखिंड हे महाराष्ट्रातील पहिले गाव आहे. गेल्या चाळीस वर्षांपासून गणेशोत्सव काळात गावातील मुस्लीम बांधव कोणत्याही प्रकारे मांसाहार करत नाहीत. यामुळे या गावात खऱ्या अर्थाने दोन्ही समाजामध्ये ऐक्याचे दर्शन घडते आहे.
सध्या कोरोनाचा काळ असल्याने शासनाच्या सर्व नियमांचे पालन करून अत्यंत साधेपणाने श्री गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली यावेळी आष्टा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित सिंग यांच्या हस्ते पूजा करण्यात आली यावेळी मंडळाचे अध्यक्ष गणेश फडके सरपंच विजय लोंढे विनायक पाटील राजेंद्र काकडे सचिन शेजवळ ए प्रशांत थोरात सुभाष थोरात राजेंद्र पाटील फत्तेसिंग थोरात माजी सरपंच रहेना जमादार दस्तगीर इनामदार रियाज मुलानी सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबर उपस्थित होते.