ETV Bharat / state

दुुष्काळी आटपाडी तालुक्यात पाऊसाचा कहर; भिंत कोसळून सख्ख्या बहिणी ठार - आटपाडीतील पूल पाण्याखाली

सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्याची दुष्काळी तालुका म्हणून ओळख आहे. मात्र, दोन दिवसांपासून तालुक्यात मुसळधार पाऊस पडतोय. यामुळे तालुक्यातील ओढ्यांना पूर आल्याने अनेक पूल पाण्याखाली गेलेत. आटपाडी शहरात भिंत अंगावर कोसळल्याने दोन चिमुरड्या सख्ख्या बहिणींचा मृत्यू झाला आहे.

heavy rain fall in aatpadi
आटपाडी तालुक्यात पावसाचा कहर
author img

By

Published : Sep 18, 2020, 9:54 PM IST

सांगली - सांगलीच्या दुष्काळी आटपाडी तालुक्यात पावसाचा कहर सुरू आहे.दोन दिवसांपासून तालुक्यात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे आटपाडी तालुक्यातील अनेक पूल पाण्याखाली गेले आहेत तर माणगंगा नदीला पूर आला आहे. पावसामुळे आटपाडी मधील एका घराची भिंत कोसळून दोन चिमुरडया सख्ख्या बहिणींचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

आटपाडी तालुक्यात पावसाचा कहर

सांगली जिल्ह्याचा दुष्काळी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आटपाडी तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून परतीच्या पावसाचा कहर सुरू आहे.2 दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे तालुक्यातले अनेक तलाव भरून गेले आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी तलाव ओसंडून वाहत आहेत. शुक्रवारी दिवसभर संततधार आणि मुसळधार पडलेल्या पावसामुळे माणगंगा नदीला पूर आला आहे. त्याचबरोबर अनेक गावातील नाले आणि ओढे सुद्धा दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी असणारे छोटे बंधारे,पूल हे पाण्याखाली गेलेले आहेत. निंबवडे-आटपाडी, म्हसवड-आटपाडी,आटपाडी-दिघांची,आणि लिंगेवर- राजेवाडी हे पूल पाण्याखाली गेल्याने येथील जवळच्या गावांचा संपर्क तुटला आहे.

आटपाडी शहरातल्या शुक ओढ्यालाही पूर आल्यामुळे या ठिकाणी असणारा पूल पाण्याखाली गेला आहे. त्याबरोबर ओढ्याच्या शेजारी असणाऱ्या आटपाडी ग्रामपंचायत जवळच्या सुमारे 40 हून अधिक दुकानांमध्ये ओढ्याच्या पुराचे पाणी शिरले आहे.

आटपाडी शहरातल्या सागर मळा या ठिकाणी असणाऱ्या प्रकाश कुंभार यांच्या घराची भिंत कोसळून दोन चिमुरड्या मुली ठार झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये वैशाली प्रकाश कुंभार,वय 2 वर्षे आणि तृप्ती प्रकाश कुंभार,वय 3 वर्षे या दोन बहिणींचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचा-ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना कोरोनाची लागण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.