ETV Bharat / state

सांगलीत भाजप उमेदवार संजय पाटलांच्या समर्थनावरून शिवसेनेतच जुंपली; सेनेत गटबाजीला उधाण - sanjay vibhute

अधिकाराचा प्रश्न उपस्थित करत शिवसेनेच्या जिल्हा प्रमुख संजय विभूतेंच्या गटाने, दुसऱ्या गटावर परस्पर निर्णय घेत असल्याचा आरोप केला आहे. तर विभूतेंच्या गटाची भूमिका युतीच्या उमेदवाराविरोधात असल्याचा आरोप काही शिवसैनिकांनी केला आहे

जिल्हा प्रमुख संजय विभूते यांचा गट
author img

By

Published : Mar 22, 2019, 8:21 PM IST

Updated : Mar 22, 2019, 9:28 PM IST

सांगली - सांगली मतदारसंघासाठी युतीने भाजप खासदार संजयकाका पाटील यांना उमेदवारी दिली आहे. मात्र, शिवसेनेत त्यांना समर्थन देण्यावरून दोन गट तयार झाले आहेत. अधिकाराचा प्रश्न उपस्थित करत शिवसेनेच्या जिल्हा प्रमुख संजय विभूतेंच्या गटाने, दुसऱ्या गटावर परस्पर निर्णय घेत असल्याचा आरोप केला आहे. तर विभूतेंच्या गटाची भूमिका युतीच्या उमेदवाराविरोधात असल्याचा आरोप काही शिवसैनिकांनी केला आहे. या दोन्ही गटाने एकमेकांच्या हकालपट्टी करण्याची मागणी वरिष्ठांकडे केली आहे.

संजय पाटलांच्या समर्थनावरून शिवसेनेतच जुंपली

सांगली लोकसभेची जागा शिवसेनेकडून लढण्याबाबत तयारी सुरू होती. या जागेबाबत स्थानिकांनी पक्षाकडे मागणीही केली होती. मात्र, जागा वाटपात ही जागा भाजपच्या पदरात पडल्याने भाजपने खासदार संजयकाका पाटील यांना पुन्हा उमेदवारी दिली. या उमेदवारीला समर्थन देण्याबाबत शिवसेनेत वाद निर्माण झाला आहे.

जिल्हा प्रमुख संजय विभूते यांच्या गटाने युतीचे उमेदवार संजयकाका पाटील यांच्या विरोधात काम करण्याची भूमिका घेतल्याचा आरोप शहर शिवसेनेचे पदाधिकारी करत आहेत. शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेच्या रावसाहेब घेवारे, अनिल शेटे गटाने जिल्हा प्रमुख यांच्या हकालपट्टीची मागणी करत शिवसेनेकडून युती धर्म पाळण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे.
यानंतर जिल्हा प्रमुख संजय विभूते गटाने देखील पत्रकार परिषद घेऊन या आरोपांचे खंडन केले. संजयकाका यांच्याबाबत पदाधिकाऱयांनी नाराजी व्यक्त केली असून याबाबत मंत्री दिवाकर यांच्या कानावर ही गोष्ट घालण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. सांगलीमध्ये सोमवारी संजयकाका पाटील यांच्यासोबतच्या बैठकीनंतर नाराजी दूर होईल, असे आश्वासन त्यांनी दिले आहे. संजयकाका पाटील यांच्या विरोधात भूमिका घेण्याचा प्रश्न नसल्याचे जिल्हा प्रमुख संजय विभूते यांनी स्पष्ट केले आहे. ज्या लोकांना हे आरोप केले आहेत. ते कोणत्याही पदावर नसून केवळ पाकिटमारी करणारी टोळी असल्याचा आरोप यावेळी केला.

Intro:सरफराज सनदी - सांगली .

Avbb

Feed send - file name - R_MH_1_SNG_22_MARCH_2019_SHIVSENA_VAAD_SARFARAJ_SANADI - to - R_MH_4_SNG_22_MARCH_2019_SHIVSENA_VAAD_SARFARAJ_SANADI

स्लग - युतीच्या भाजपा उमेदवार संजयकाका पाटील यांच्या समर्थनावरून शिवसेनेत जुंपली - दोन्ही गटाकडून एकमेकांच्या हकालपट्टीची मागणी .

अँकर - सांगली शिवसेनेत युतीतील भाजपा उमेदवार संजयकाका पाटील यांना समर्थन देण्यावरून जुंपली आहे. अधिकारीचा प्रश्न उपस्थित करत शिवसेनेच्या जिल्हा प्रमुख गटाने ,दुसऱ्या गटावर परस्पर निर्णय घेत असल्याचा आरोप केला आहे.तर युतीच्या उमेदवारा विरोधात जिल्हा प्रमुख गटाची भूमिका असल्याचा आरोप करण्यात आला असून या दोन्ही गटाने एकमेकांच्या हकालपट्टी करण्याची मागणी पक्षाकडे केल्याचे सांगितले आहे.Body: व्ही वो - सांगली लोकसभेची जागा शिवसेनेकडून लढण्याबाबत तयारी सुरू होती.पक्षाकडे या जागेबाबत मागणी करण्यात आली होती.मात्र युतीमध्ये भाजपच्या वाटेची जागा असल्याने, याठिकाणी भाजपाने खासदार संजयकाका पाटील यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे.तरी या उमेदवारीला समर्थन देण्याबाबत वाद निर्माण झाला आहे.
जिल्हा प्रमुख संजय विभूते गटाने युतीचे उमेदवार संजयकाका पाटील यांच्या विरोधात काम करण्याची भूमिका घेतल्याचा आरोप शहर शिवसेनेच्या पदाधिकारयांनी करत,याविरोधात आज पत्रकार परिषदेत घेऊन शिवसेनेच्या रावसाहेब घेवारे,अनिल शेटे गटाने जिल्हा प्रमुख यांच्या हक्कलपट्टीची मागणी करत शिवसेनेकडून युती धर्म पाळण्यात येईल,असे स्पष्ट करण्यात आले आहे.

बाईट - अनिल शेटे - शिवसेना पदाधिकारी ,सांगली.

व्ही वो - तर जिल्हा प्रमुख संजय विभूते गटाने सुद्धा पत्रकार परिषद घेऊन या आरोपांचे खंडन करत,संजयकाका यांच्याबाबत पदाधिकारयांनी नाराजी व्यक्त केली आहे.आणि याबाबत मंत्री दिवाकर यांच्या कानावर ही गोष्ट घालण्यात आली,असून २५ रोजी सांगलीत संजयकाका पाटील यांच्याशी बैठक घेऊन याबाबतची नाराजी दूर होईल असे आश्वासन दिले आहे.त्यामुळे संजयकाका पाटील यांच्या विरोधात भूमिका घेण्याचा प्रश्न नसल्याचे जिल्हा प्रमुख संजय विभूते यांनी स्पष्ट करत , ज्या लोकांना हे आरोप केले आहेत,ते कोणत्याही पदावर नसून केवळ पाकिटमारी करणारी टोळी असल्याचा आरोप केला आहे.तसेच पक्षाच्या नेत्यांची भूमिका स्पष्ट होण्याआधी निर्णय जाहीर करण्याचा अधिकार काय ? असा सवाल करत पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडे तक्रार करण्यात आली असून पक्षा विरोधात भूमिका घेणाऱयांची आपण हक्कलपट्टी करण्याची मागणी केल्याचे संजय विभूते यांनी सांगितले आहे.

बाईट - संजय विभूते - जिल्हा प्रमुख ,शिवसेना ,सांगली .
Conclusion:
Last Updated : Mar 22, 2019, 9:28 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.