ETV Bharat / state

धनगर आरक्षणप्रश्नी महाआघाडी सरकार अपयशी, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करत नोंदवला निषेध.. - धनगर आरक्षणप्रश्नी आघाडी सरकार अपयशी

धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी विविध पातळीवर आंदोलने सुरू आहेत. महाविकास आघाडी सरकारकडून सत्तेत येण्याआधी धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र आज महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष झाले तरी धनगर आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागला नाही, असा आरोप करत धनगर विवेक जागृती अभियान संघटनेकडून आंदोलन करण्यात आले.

Dhangar reservation
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने
author img

By

Published : Nov 28, 2020, 5:10 PM IST

Updated : Nov 28, 2020, 5:19 PM IST

सांगली - धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी सांगलीमध्ये आंदोलन करण्यात आले. महाविकास आघाडी सरकारला सत्तेत येऊन एक वर्ष पूर्ण होऊनही आरक्षणाचा प्रश्न मार्गी न लावल्याचा निषेधार्थ धनगर विवेक जागृती अभियान संघटनेकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

धनगर समाजाची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निर्दशने
वर्षपूर्ती निमित्ताने सरकारविरोधात आंदोलन..धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी विविध पातळीवर आंदोलने सुरू आहेत. महाविकास आघाडी सरकारकडून सत्तेत येण्याआधी धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र आज महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष झाले आहे. पण धनगर आरक्षणाचा प्रश्न सरकारकडून सोडवण्यात आला नाही, असा आरोप करत धनगर विवेक जागृती अभियान संघटनेकडून महाविकास आघाडी सरकारविरोधात आंदोलन केले आहे. संस्थापक अध्यक्ष विक्रम ढोणे यांच्या नेतृत्वाखाली सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सरकारच्या निषेधार्थ निदर्शने करण्यात आले आहे. यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.धनगर आरक्षणप्रश्नी ठाकरे सरकार अपयशी -ठाकरे सरकारने सत्तेत आल्यानंतर किमान सामना कार्यक्रम राबवून धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यात येईल, असे जाहीर केले होते. मात्र यामध्ये ठाकरे सरकार अपयशी ठरले आहे. असा आरोप धनगर विवेक जागृती अभियान संघटनेकडून करण्यात आला आहे, तसेच ठाकरे सरकारने तातडीने मंत्री मंडळाची आणि केंद्राची समन्वय समिती स्थापन करून धनगर समाजाला आरक्षण देण्याची भूमिका घ्यावी, अन्यथा यापुढील काळात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला आहे.

Last Updated : Nov 28, 2020, 5:19 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.