सांगली : जिल्हा शासकीय हॉस्पिटलमधील वैद्यकीय अधीक्षक डॉक्टरचा हृदयविकाराचा झटका आल्याने जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली (death due to heart attack) आहे. रुग्णालयामध्ये रुग्णावर उपचार करून घरी गेल्यावर डॉक्टर नंदकिशोर गायकवाड यांना हा हृदयविकाराचा झटका आला. ज्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला (Government Hospital Medical Superintendent Doctor) आहे.
हृदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यू : सांगली शहरातील प्रसिद्ध स्त्री रोग डॉक्टर आणि वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक म्हणून असणारे डॉक्टर नंदकिशोर गायकवाड (वय 46) यांचा हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आज मंगळवारी सकाळी डॉक्टर नंदकिशोर गायकवाड हे शासकीय रुग्णालयामध्ये पोहोचले होते. त्यानंतर एका रुग्णावर शस्त्रक्रिया करून डॉक्टर गायकवाड हे नाष्टा करण्यासाठी आपल्या घरी गेले होते. नाष्टा करत असतानाच त्यांच्या छातीत दुखू लागले. तीव्र हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रामध्ये एकच खळबळ उडाली (Medical Superintendent Doctor death) आहे.
मृत्युच्या घटनेमुळे हळहळ : तर नंदकिशोर गायकवाड यांच्या या मृत्युच्या घटनेमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. डॉक्टर गायकवाड हे अत्यंत शांत आणि संयमी स्वभावाचे आणि मनमिळावू डॉक्टर म्हणून परिचित होते. स्त्री रोग तज्ञ म्हणून शासकीय रुग्णालयामध्ये ते सेवा बजावत होते. वैद्यकीय अधीक्षक म्हणून देखील त्यांच्यावर जबाबदारी (Doctor Death) होती.
जीवनशैलीत हे बदल करा : जीवनशैलीतील बदलांमुळे दुसऱ्या हृदयविकाराच्या झटक्याचा धोका कमी होऊ शकतो, असे एका नवीन अभ्यासात दिसून आले आहे. खरे तर, एक अभ्यास आहे जो दर्शवितो की जर तुम्ही हृदयविकाराच्या झटक्यानंतर तुमची व्यायामशाळा नियमित केली तर हृदयविकाराचा धोका कमी (Hospital Medical Superintendent Doctor) होतो.
हृदयविकाराच्या जोखमीबद्दल संशोधन : अभ्यासानुसार, सुमारे 1,100 प्रौढांकडून डेटा गोळा करण्यात आला. या सर्वांना 1990 च्या दरम्यान हृदयविकाराचा झटका आला. सरासरी वय 73 वर्षे होते. संशोधकांना असे आढळून आले की, जे लोक शारीरिकदृष्ट्या निरोगी आहेत आणि तरीही नियमित व्यायाम करतात त्यांना हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका 34 टक्के कमी (death due to heart attack) आहे.
वर्कआउट करताना : तंदुरुस्त राहण्यासाठी व्यायामशाळेची दिनचर्या पाळणे महत्त्वाचे आहे. परंतु हेवी वर्कआउट न करण्याचेदेखील लक्षात ठेवा. या चुकीमुळे फायद्याऐवजी नुकसान होऊ शकते. याशिवाय चालणे, पोहणे, सायकल चालवणे, धावणे आदींमुळेही हृदयविकाराचा झटका टाळता येतो. त्याच वेळी, आपला आहार बदलणे, धूम्रपान आणि अल्कोहोल टाळणे आणि वाईट सवयी सोडणे महत्वाचे आहे.