ETV Bharat / state

कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त, शासनाकडून प्रशासक नियुक्त - संचालक मंडळ बरखास्त लेटेस्ट न्यूज

सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीवर भाजप आणि काँग्रेस आघाडीची सत्ता होती. मात्र समितीच्या विद्यमान संचालक मंडळाचा कार्यकाळ संपला. कोरोनामुळे बाजार समिती संचालक पदाच्या निवडणुुका अश्यक्य असल्याने शासनाने बाजार समितीवर प्रशासक नेमण्याच्या हालचाली सुरू होत्या.

market
कृषी उत्पन्न बाजार समीती
author img

By

Published : Aug 28, 2020, 3:35 PM IST

सांगली - कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रशासनाकडून प्रशासक नियुक्त करण्यात आला आहे. मुदत संपल्याने विद्यमान संचालक मंडळ बरखास्त करत शासनाने प्रशासकाची नियुक्ती केली असून पुढील आदेश येईपर्यंत सांगली बाजार समितीवर प्रशासक राज राहणार आहे.

सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीवर भाजप आणि काँग्रेस आघाडीची सत्ता होती. मात्र समितीच्या विद्यमान संचालक मंडळाचा कार्यकाळ संपला. कोरोनामुळे बाजार समिती संचालक पदाच्या निवडणुुका अश्यक्य असल्याने शासनाने बाजार समितीवर प्रशासक नेमण्याच्या हालचाली सुरू होत्या.

कृषी राज्य मंत्री विश्वजित कदम आणि जतचे काँग्रेस आमदार विक्रम सावंत यांनी संचालक मंडळाला मुदत वाढ देण्याची मागणी पणन विभागाकडे केली होती. मात्र या खात्याची प्रभारी जबाबदारी असणाऱ्या जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी ही मागणी फेटाळून लावत, संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नियुक्त करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केला आहे. त्यानुसार कृषी उत्पन बाजार समितीवर सांगली जिल्हा उपनिबंधक निळकंठ करे यांची शासनाकडून प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी आज पदभार स्वीकारला आहे.

बाजार समितीच्या विद्यमान संचालक मंडळाची मुदत संपल्याने आणि कोरोनाची परिस्थिती असल्याने निवडणूक घेता येत नसल्याने यावर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीवर भाजप आणि काँग्रेस आघाडीची सत्ता असून आता पुढील आदेश येईपर्यंत सांगली बाजार समितीचे कामकाज प्रशासक पाहणार आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.