ETV Bharat / state

तुमच्या सारख्या हुजऱ्यांना वाघाच्या शेपटाचीही उपमा नाही - गोपीचंद पडळकरांचा शिवसेनेवर हल्लाबोल - ETV BHARAT MAHARASHTRA

'महाराष्ट्रात एकच वाघ होते. ते म्हणजे आमचे दिवंगत बाळासाहेब ठाकरे. त्यामुळे तुमच्या सारख्या हुजऱ्यांना वाघाच्या शेपटाचीही उपमा देता येणार नाही. कारण तुम्ही तुमचे शेपूटही...' अश्या शब्दात पडळकर यांनी शिवसेनेवर बोचरी टीका करत जनतेला दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Gopichand Padalkar attack on ShivSena in sangli
तुमच्या सारख्या हुजऱ्यांना वाघाच्या शेपटाचीही उपमा नाही - गोपीचंद पडळकरांचा शिवसेनेवर हल्लाबोल
author img

By

Published : Oct 15, 2021, 4:23 PM IST

सांगली - दगा फटका करून सत्तेत आलेल्या आघाडी सरकारकडून महाराष्ट्राची लुट सुरू आहे, अशी टीका भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. तसेच बाळासाहेब ठाकरे हे वाघ होते, तुमच्या सारख्यांना शेपटीची उपमा देता येणार नाही, अशी बोचरी टीका शिवसेनेवर त्यांनी केली आहे. आटपाडीच्या झरे येथे दसऱ्याच्या निमित्ताने शुभेच्छा देताना पडळकर यांनी निशाणा साधला आहे.

आमदार गोपीचंद पडळकरांचा शिवसेनेवर हल्लाबोल
  • फक्त लुटण्याचे काम सुरू आहे -

आमदार पडळकर म्हणाले, माझा महाराष्ट्र खरोखर सोन्यासारखा आहे आणि तुमचे महाविकास आघाडीचे सरकार दगाफटक्याने सत्तेत आल्यापासून, महाराष्ट्राला लुटण्याची एकही संधी आघाडी सरकार सोडत नाही. मागील दोन वर्षात कोकणाला वादळाने दोन वेळा फटका दिला. शेतकऱ्यांची पीक दुष्काळात तर कधी ओल्या दुष्काळात माती मोल झाली. इतकेच नव्हे तर स्वप्नील लोणकर सारखा होतकरू मुलगा आत्महत्या करतो. तसेच महाराष्ट्रात लालपरीची सेवा देणाऱ्या तब्बल २८ कर्मचाऱ्यांना पगारा अभावी आत्महत्या करावी लागते. त्याचबरोबर अनेक बारा बलुतेदारांवर, भटक्यांवर आर्थिक चणचणीमुळे आत्महत्या करण्याची वेळे येते. हे सर्व सुरू असताना तुम्ही फक्त मदतीचे कागदी घोडे नाचवता आणि मुळात खरी मदत कधी पोहचतच नाही, असे ते बोलतांना म्हणाले.

  • मलीद्यासाठी तुमच्या एक वाच्यता -

सामान्यांच्या निर्णयासाठी तुमच्या तिघाडीत बिघाडी असते. पण बदलीतून मिळणाऱ्या मलीद्यासाठी तुमच्या एक वाच्यता असते. म्हणूनच तुमच्यासाठी रोजच दिवाळी आणि दसरा आहे. तसेच जनाब राऊत मेंढ्या ह्या शेतकऱ्यांसाठी जीविकेचे साधन आहे. ते दुधही देते आणि ऊबही देते, हे तुम्हा वसुलीवाल्यांना समजणार नाही. अश्या शब्दात खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला.

  • तुम्हाला शेपटाचीही उपमा नाही -

तर शिवसेनेवर टीका करताना पडळकर म्हणाले, 'महाराष्ट्रात एकच वाघ होते. ते म्हणजे आमचे दिवंगत बाळासाहेब ठाकरे. त्यामुळे तुमच्या सारख्या हुजऱ्यांना वाघाच्या शेपटाचीही उपमा देता येणार नाही. कारण तुम्ही तुमचे शेपूटही...' अश्या शब्दात पडळकर यांनी शिवसेनेवर बोचरी टीका करत जनतेला दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा - विजयादशमीनिमित्त जी शस्त्रं काढली जातात ती कोणासाठी कशासाठी काढली जातात हे कळेल - संजय राऊत

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.