सांगली - काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी महाविकास विकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रावरून भाजपचे प्रवक्ते व आमदार गोपीचंद पडळकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. तसेच काँग्रेस मंत्र्यांनी सत्तेची लाचारी नाकारून सत्तेवर लाथ मारावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे. सांगलीच्या झरे याठिकाणी ते बोलत होते.
सोनियांचे मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र..
राज्यातील महाविकास आघाडी सरकारला नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना किमान सामना कार्यक्रमाची आठवण करून पत्र लिहिले आहे. ज्यामध्ये अनुसूचित जाती-जमाती यांच्या रिक्त जागा लवकर भराव्यात, आदिवासी विकास योजनांना आवश्यक तो निधी देऊन यासंदर्भातील कार्यवाही करावी, आदिवासी विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवावेत, त्यांना आवश्यक त्या सुविधा देण्यात याव्यात आणि अनुसूचित जाती आणि जमातीच्या लोकसंख्येनुसार अर्थसंकल्पात तरतूद करावी, अशा प्रमुख मागण्या आपल्या पत्राद्वारे केल्या आहेत.
सोनियांचे पत्र म्हणजे सरकारच्या नाकर्तेपणाचा पोचपावती, आता तरी काँग्रेसने सत्तेवर लाथ मारावी - पडळकर - गोपीचंद पडळकर
काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी महाविकास विकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून किमान समान कार्यक्रमाची आठवण करून दिली आहे. आता तरी काँग्रेस मंत्र्यांनी सत्तेवर लाथ मारावी, असे आवाहन गोपीचंद पडळकर यांनी केले आहे.
![सोनियांचे पत्र म्हणजे सरकारच्या नाकर्तेपणाचा पोचपावती, आता तरी काँग्रेसने सत्तेवर लाथ मारावी - पडळकर Gopichand Padalkar](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-9934120-969-9934120-1608370435289.jpg?imwidth=3840)