ETV Bharat / state

प्रेम प्रकरणातून मित्राची गळा चिरून हत्या - love affair

प्रेमसंबंधाच्या आड येत असल्याने मित्रानेच मित्राची हत्या केल्याची घटना वाळवा तालुक्यातल्या वाघवाडीमध्ये घडली आहे. आरोपीने मित्राची गळा चिरून हत्या केली, व पोलीस ठाण्यात हजर झाला.

sangli crime news
अभिजीत शेलार
author img

By

Published : Oct 21, 2020, 10:43 PM IST

सांगली - वाळवा तालुक्यातील वाघवाडी येथील पेठ जांभुळवाडी रस्त्यावर मित्रानेच मित्राचा पाठलाग करत धारदार शस्त्राने गळा चिरून निघृण खून केला. अभिजीत हरी शेलार असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना बुधवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान हत्या करून आरोपी राजेंद्र बांदल हा इस्लामपूर पोलीस ठाण्यात हजर झाला. हा खून प्रेम प्रकरणातून झाल्याची कबुली आरोपी बांदल याने पोलिसांना दिली.

अभिजीत व राजेंद्र हे चांगले मित्र होते. दोघेही अविवाहित असून सेंट्रीग कामाबरोबरच मोलमजूरी करत होते. मृत अभिजीत हा सध्या एस.वाय.बीए मध्ये शिकत होता. बुधवारी सकाळपासून हे दोघे एका दुचाकीवरून फिरत होते. मृत अभिजीत याचे पूर्वी एका मुलीसोबत प्रेमसंबंध होते. अभिजीतचा प्रेमभंग झाल्याने, राजेंद्र बांदल याचे त्या मुलीसोबत सूत जुळले. यामुळे त्या दोघांमध्ये वाद होत असत. अभिजीत आपल्या प्रेमाच्या आड येत आहे, याचा राग मनात धरून आरोपीने त्याची हत्या केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.