ETV Bharat / state

राष्ट्रवादीच्या 'त्या' नेत्याच्या हत्येसाठी दिली होती ४० लाखांची सुपारी, चौघे ताब्यात - सांगली पोलीस

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे खासगी सचिव गजानन पाटील यांचे बंधू आणि पलूस तालुक्यातील राष्ट्रवादीचे नेते आनंदराव पाटील यांच्या हत्ये प्रकरणी चौघांना सांगली पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. वैयक्तीक कारणातून 40 लाखांची सुपारी देत दे ही हत्या गावातील दोघांनी घडवून आणल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.

अटकेतील आरोपी
अटकेतील आरोपी
author img

By

Published : Feb 10, 2020, 5:41 PM IST

Updated : Feb 10, 2020, 8:01 PM IST

सांगली - राष्ट्रवादी काँग्रेस नेते आनंदराव पाटील यांच्या हत्येचा अखेर उलगडा झाला आहे. पूर्ववैमनस्यातून 40 लाखांची सुपारी देऊन ही हत्या करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी सांगली पोलिसांनी चौघांना अटक केली आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस सुहेल शर्मा यांनी दिली आहे.

माहिती देताना पोलीस अधीक्षक

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे खासगी सचिव गजानन पाटील यांचे बंधू आणि पलूस तालुक्यातील राष्ट्रवादीचे नेते आनंदराव पाटील यांच्या हत्या प्रकरणचा 8 दिवसानंतर छडा लावण्यात सांगली पोलिसांना यश आले आहे. दि. 2 फेब्रुवारी रोजी पलूसच्या खटाव येथे आनंदराव पाटील यांच्या हत्येची घटना घडला होती. यामुळे जिल्ह्यातील खळबळ उडाली होती.

हेही वाचा - खून का बदला खून? राष्ट्रवादी नेत्याच्या हत्ये प्रकरणी शिवसेना उपजिल्हाप्रमुखासह तिघांना अटक

या प्रकरणी सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने गतीने तपास करत खुनाचा छडा लावला आहे. 40 लाख रुपयांची सुपारी देऊन आनंदराव पाटील यांचा खून झाल्याचे उघडकीस आणले आहे. वैयक्तिक वादातून हा खून झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. या हत्या प्रकरणी चार संशयितांना अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा - 'राष्ट्रवादी नेत्यांची हत्या दुर्दैवी, पोलीस लवकर तपास करून आरोपींवर कारवाई करतील'

जमीनीचा वाद आणि पूर्ववैमनस्यातून अरविंद पाटील आणि लक्ष्मण मडीवाल या गावातील दोघांनी पुण्याच्या अतुल जाधव आणि दत्तात्रय जाधव या दोघांना आनंदराव पाटील यांच्या हत्येसाठी 40 लाखांची सुपारी दिल्याचे समोर आले आहे. मडीवाल यांच्याशी पाटील यांचे पूर्ववैमनस्य होते तर अरविंद पाटील यांचे शेत आंनदराव पाटील यांनी विकत घेतले होते. या रागातून अरविंद पाटील व लक्ष्मण मडीवाल यांनी सुपारी देऊन आंनदराव पाटील यांचा काटा काढला आहे. या प्रकरणी पोलिसांनी अरविंद पाटील, लक्ष्मण मडीवाल, अतुल जाधव आणि दत्तात्रय जाधव या चौघांना अटक केली आहे.

सुरुवातीला राजकीय वादातून ही हत्या झाल्याचे बोलले जात होते. मात्र, संशयित आरोपी सापडल्यानंतर हा खून गावातील वैयक्तिक वादातून झाल्याचे निष्पन्न झाले, असे सांगलीचे पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी सांगितले आहे.

हेही वाचा - धक्कादायक ! सांगलीत आणखी एका राष्ट्रवादीच्या नेत्याची हत्या

Intro:
File name - mh_sng_01_ncp_leder_murder_open_vis_01_7203751.- mh_sng_01_ncp_leder_murder_open_byt_04_7203751

स्लग - 'त्या' राष्ट्रवादी नेत्याची ४० लाख रुपयांची सुपारी देऊन झाली हत्या, चौघांना करण्यात आली अटक...

अँकर - राष्ट्रवादी काँग्रेस नेते आनंदराव पाटील यांच्या हत्येचा अखेर उलगडा झाला आहे.पूर्ववैमनस्यातून ४० लाखांची सुपारी देऊन ही हत्या करण्यात आल्याचे उघडकीस झाले असून या प्रकरणी चौघांना सांगली पोलिसांनी अटक केली आहे.जिल्हा पोलीस सुहेल शर्मा यांनी ही माहिती दिली आहे.

व्ही वो - राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे खासगी सचिव गजानन पाटील यांचे बंधू आणि पलूस तालुक्यातील राष्ट्रवादीचे नेते आनंदराव पाटील यांच्या हत्या प्रकरणचा ८ दिवसानंतर छडा लावण्यात सांगली पोलिसांना यश आले आहे.२ फेब्रुवारी रोजी पलूसच्या खटाव येथे आनंदराव पाटील यांच्या हत्येचा प्रकार घडला होता.यामुळे जिल्ह्यातील खळबळ उडाली होती. याप्रकरणी सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने गतीने तपास करत खुनाचा छडा लावला आहे.४० लाख रुपयांची सुपारी देऊन आनंदराव पाटील यांचा खून झाल्याचे उघडकीस आणले आहे.वैयक्तिक वादातून हा खून झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.या हत्या प्रकरणी चौघा संशयितांना अटक करण्यात आली आहे.
जमीनीचा वाद आणि पूर्ववैमनस्यातून अरविंद पाटील आणि लक्ष्मण मडीवाल या गावातील दोघांनी पुण्याच्या अतुल जाधव आणि दत्तात्रय जाधव या दोघांना आनंदराव पाटील यांच्या हत्येसाठी 40 लाखाची सुपारी दिल्याचे समोर आले आहे.मडीवाल यांच्याशी पाटील यांचे पूर्ववैमनस्य होते तर अरविंद पाटील यांचे शेत आंनदराव पाटील यांनी विकत घेतले होते.आणि या रागातून अरविंद पाटील व लक्ष्मण मडीवाल यांनी सुपारी देऊन आंनदराव पाटील यांचा काटा काढला आहे. या प्रकरणी पोलिसांनी अरविंद पाटील ,लक्ष्मण मडीवाल,अतुल जाधव आणि दत्तात्रय जाधव या चौघांना अटक केली आहे.

सुरवातीला राजकीय वादातून ही हत्या झाल्याचे बोलले जात होते, मात्र संशयित आरोपी सापडल्या नंतर हा खून गावातील वयक्तिक वादातून झाल्याचे निष्पन्न झाल्याचे सांगलीचे पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी सांगितले आहे.

बाईट: सुहेल शर्मा, पोलीस अधीक्षक सांगलीBody:....Conclusion:
Last Updated : Feb 10, 2020, 8:01 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.