ETV Bharat / state

कोरोनाचा कहर; मिरजेच्या स्टेट बॅंकेतील 19 कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा - अपडेट कोरोना न्यूज

मिरज शहरातील स्टेट बॅंकेच्या मुख्य शाखेतील 21 पैकी 19 कर्मचा-यांना कोरोनाची बाधा झाल्याचे अँटीजेन तपासणीत स्पष्ट झाले आहे. तर एकाच शाखेतील 19 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याने बँक प्रशासन हादरून गेले आहे.

Sbi
स्टेट बॅंक
author img

By

Published : Aug 21, 2020, 3:40 PM IST

सांगली - मिरजेतील स्टेट बँकमधील 19 कर्मचाऱ्यांना कोरोना लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे बँक प्रशासन हादरून गेले आहे. एकाच शाखेतील 19 कर्मचारी पॉझिटिव्ह आल्याने बँक प्रशासनाने काही दिवसांसाठी आता बँकेचे कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

सांगली, मिरज, कुपवाड महापालिका क्षेत्रात कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव वाढला आहे. मिरज शहरातील शिवाजी रोडवरील पंचायत समिती शेजारी असलेल्या स्टेट बॅंकेच्या मुख्य शाखेतील 21 पैकी 19 कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे अँटीजेन तपासणीत स्पष्ट झाले आहे. तर एकाच शाखेतील 19 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याने बँक प्रशासन हादरून गेले आहे. तर आता या कोरोना बाधित कर्मचाऱ्यांची पुन्हा आर. टी. पी. सी. आर. तपासणी करण्यात येणार आहे. तोपर्यत बँकेचे कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

शाखा व्यवस्थापकांनी स्टेट बॅंकेच्या सर्व वरिष्ठांसह, रिझर्व्ह बॅंक आणि जिल्हाधिका-यांनाही याबाबतचा अहवाल पाठवला आहे. या बॅंकेत शहरातील पन्नासहुन अधिक शासकीय कार्यालये, त्यांचे कर्मचारी यांच्याशिवाय कित्येक हजार निवृत्त सरकारी, निमसरकारी कर्मचा-यांची खाती या शाखेत आहेत. ही सर्व कार्यालये आणि त्यांच्याशी संलग्न घटकांना बॅंक बंद राहण्याचा मोठा फटका बसणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.